accident Mahrashtra

शेंद्रा एमआयडीसीच्या रेडीको एनव्ही कंपनीमध्ये मका साठवून ठेवणारी टाकी वेल्डिंग करताना कोसळली; चार कामगारांचा मृत्यू,एक गंभीर जखमी

Share

छत्रपती संभाजी नगर , दि.16 नोव्हेंबर:

छत्रपती संभाजी नगरच्या शेंद्रा एमआयडीसीच्या रेडीको एनव्ही कंपनीमध्ये मका साठवून ठेवणाऱ्या टाकीला वेल्डिंग करता वेळेस टाकी कोसळली, त्यामध्ये आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झालाय. तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

आपल्या भाच्याचा मृतदेह ठिगाऱ्याखाली सापडल्यानंतर मामाने टाहो फोडला, संतोष पोपळघट या कामगाराचे अक्षरशः शरीराचे तुकडे-तुकडे मिळाले, हे पाहून सोबत काम करणाऱ्या कामगारांचाही टाहो पाहायला मिळाला, या घटनेनंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घटनास्थळी पाहणी केली,

यावेळी कंपनी व्यवस्थापकाने माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यानंत नातेवाईक यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले, कंपनी व्यवस्थापकांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली आणि कंपनीत कोणत्याही प्रकारची सेफ्टी नसल्याचे निदर्शनास आल्याकारणाने यांच्यावर सदोष मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे करणार आहे.

Related posts

जिथे पाणी नाही तिथे मत्स्य विद्यापीठ ; आंधळ दळतंय अन् कुत्रं पीठ खातय

editor

‘महायुतीचे काळे कारनामे’ पुस्तिकेचे अनावरणराज्यात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढलाय – जयंत पाटील

editor

कबड्डी, खोखो, कुस्ती, व्हॉलीबॉल या स्पर्धांसाठी आता एक कोटींचा निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार

editor

Leave a Comment