जालना , दि.16 नोव्हेंबर :
जालना मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार कैलास गोरंट्याल यांच्या प्रचारार्थ शहरातील गांधी चमन येथे भव्य प्रचार सभा संपन्न झाली. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सचिन पायलट यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थितांना संबोधित करताना सचिन पायलट यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
यावेळी बोलताना पायलट म्हणाले की, सकाळी उठल्यापासून बीजेपी वाले काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांच्या नावाने बोटं मोडत आहेत. नेहरूंनी हे केले इंदिरा गांधींनी ते केले अशा प्रकारचे वक्तव्य दिवसभर यांचे चालू असतात. परंतु दहा वर्ष सरकारमध्ये असताना मोदी सरकारने काय केले यांचा मेनूफेस्ट जनतेला दाखवावे. एखादी योजना आणायची आणि त्याच्या मोठा गाजावाजा करायचा बॅनर, टेलिव्हिजन, होर्डिंग च्या माध्यमातून धिंडोरा पिटवायचा हे भाजपवाल्यांचे काम आहे. युनिफॉर्म सिविल कोड, हिंदू मुस्लिम हे सर्व प्रकार निवडणुकीच्या आसपास भाजपवाल्यांना आठवतात. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात येऊन बटेंगे तो कटेंगे सारखे वक्तव्य करत आहेत. परंतु त्यांना उत्तर देताना आम्ही म्हणतो पढेंगे तो बढेंगे…
वास्तविक पाहता काँग्रेसने संजय गांधी निराधार योजना सारख्या तसेच मनरेगा सारख्या योजना राबवून रोजगाराचा अधिकार दिला,सुचनाचा आधिकार काँग्रेस ने दिला,शिक्षणाचा अधिकार काँग्रेस ने दिला,खाद्य सुरक्षा अधिकार काँग्रेस ने दिला परंतू काँग्रेस ने कधीही बॅनरबाजी आणि होर्डिंग च्या माध्यमातून गाजावाजा केला नसल्याचे सचिन पायलट म्हणाले.
आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासाठी काँग्रेसच्या हाताचा पंजा या चिन्हावर मतदान करून त्यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन सचिन पायलट यांनी उपस्थितांना केले.
यावेळी महाविकास आघाडीचे सर्व मित्र पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासह महिलांची मोठी संख्या ने उपस्थिती होती.