politics

यापुढे मी कोणतीही निवडणूक लढणार नाही – एकनाथ खडसे

Share

मुंबई , दि.18 नोव्हेंबर :

महाराष्ट्रात भाजपची मुळे रोवणारे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. जळगावच्या मुक्ताईनगर मतदारसंघातून सहा वेळा आमदार म्हणून निवडून आलेले एकनाथ खडसे यांनी  महाराष्ट्र विधानसभेची 2024 निवडणुकीत आपली कन्या रोहिणीला विजयी करा, असे आवाहन करून आता आपण निवृत्त होणार असल्याचे सांगितले. एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे भाजपमध्ये आहेत. लोकसभा निवडणुकीत रावेरमधून पुन्हा विजयी झाल्यानंतर त्यांना मोदी ३.० मध्ये मंत्री करण्यात आले. भाजप सोडल्यानंतर एकनाथ खडसे हे शरद पवार यांच्यासोबत आहेत. त्यांची कन्या रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादीकडून (शरदचंद्र पवार) निवडणूक लढवली आहे. 2019 मध्ये त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती, पण ती हरली होती.

मुक्ताई नगर विधानसभा मतदारसंघात प्रचार करताना एकनाथ खडसे यांनी आपली कन्या रोहिणी खडसे यांना निवडणुकीत विजयी करावे, असे आवाहन जनतेला केले. "यापुढे मी निवडणूक न लढाविण्याचा निर्णय घेतला आहे. मी गेली अनेक वर्ष आपल्या सोबत आहे. अनेक वर्ष आपणही मला सहकार्य केले आहे, मला आशीर्वाद दिले आहेत. मी ही तुमच्या सुख दुःखात सहभागी झालेलो आहे. कोणतीही जात धर्म न पाळता मी सर्वांना मदत करण्याची भूमिका आता पर्यंत पार पाडली आहे ". अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

तब्येत ठीक नसते, पुढील निवडणूक मी पाहणार की नाही पाहणार हे तो ईश्वरच ठरवेल. पुढील निवडणुकीत कदाचित मी असेल किंवा नसेल. पण या निवडणुकीत मी आपल्याला विनंती करणार आहे की आपण सर्वांनी रोहिणी खडसेंचा निवडून द्यावे. आपण जसं मला सहकार्य केलं तसं रोहिणीताईंना करावं आणि रोहिणी ताईंना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे ही विनंती. असेही खडसे पुढे म्हणाले

Related posts

Swati Maliwal’s Battle for Justice: Standing Alone Against AAP’s Pressure

editor

भाजपाचे उमेदवार उज्ज्वल निकमांच्या सरकारी वकीलपदी नियुक्तीस काँग्रेसचा विरोध; न्यायप्रक्रियेत भाजपाचा कार्यकर्ता कशाला?: नाना पटोले

editor

‘महायुतीचे काळे कारनामे’ पुस्तिकेचे अनावरणराज्यात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढलाय – जयंत पाटील

editor

Leave a Comment