crime Mahrashtra politics

कल्याण पूर्व मतदार संघातील ठाकरे गटाचे उमेदवार धनंजय बोडारे यांच्या कार्यकर्त्यांच्या गाडीवर हल्ला

Share

कल्याण, दि. 19 नोव्हेंबर :

उल्हासनगर मधील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कल्याण पूर्व मतदार संघातील ठाकरे गटाचे उमेदवार धनंजय बोडारे यांच्या कार्यकर्त्यांच्या गाडीवर मध्यरात्री हल्ला केल्याची घटना घडली आहे.

उल्हासनगर काम क्रमांक चार ओटी सेक्शन परिसरात धनंजय बोडरे यांची मुलगी धनश्री बोडारे आणि सोबत कार्यकर्त्यांची गाडी असे या परिसरातून जात असताना मध्यरात्रीच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गाडीवर दगडफेक करत हल्ला केला, मात्र या दगडफेकीत कार्यकर्त्यांची एका गाडीला ही दगड लागल्याने मोठ्या प्रमाणात गाडीच नुकसान झाले आहे.

यावेळी बोडारे यांची मुलगी धनश्री बोडारे ही दुसऱ्या गाडीत असल्याने थोडक्यात बचावली याप्रकरणी धनंजय बाडारे यांनी रात्री उशिरापर्यंत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट मात्र या घटनेत एका गाडीचे नुकसान झाले असून,कल्याण पूर्व मतदार संघात राजकीय वातावरण तापले आहे.

Related posts

RBI Employee Falls Victim to Scammers, Loses Rs 24.5 Lakh

editor

एकल वापर प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाईत ८५ हजार दंडात्मक रक्कम तसेच ३९.७५० किलो प्लास्टिक जमा

editor

शेतातील धान्य खराब होण्यापासून वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची हार्वेस्टरला पसंती

editor

Leave a Comment