Share
बुलढाणा , दि.28 नोव्हेंबर :
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून चार ते पाच दिवस उलटून गेले असतानाही अद्याप सरकार स्थापन तर दूरच पण मुख्यमंत्री कोण..? अशी चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत घोषणा करून या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
मात्र बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडा राजा मतदार संघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवनियुक्त आ. मनोज कायंदे व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नाझिर काझी यांनी शेकडो कार्यकर्त्यांना घेत सिंदखेड राजा येथील जिजाऊंच्या जन्मस्थळी राजमाता जिजाऊंना दुग्धाभिषेक घालून पहिल्या अडीच वर्षासाठी अजित पवार यांना मुख्यमंत्री करा अशी मागणी केली आहे. काही वेळापूर्वीच मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरू असतानाच आता या नवीन मागणीने चर्चेला उधाण आलं आहे.