Uncategorized

बांगलादेश सीमेवर दुसरबीड येथील जवान प्रदीप घुगे यांचे हृदयविकाराने निधन

Share

बुलढाणा , दि.29 नोव्हेंबर :

बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र दुसरबीड येथील रहिवासी सीमा सुरक्षा बलाचे जवान प्रदीप पंढरीनाथ घुगे यांचे त्रिपुरा राज्यातील आगरतळा येथे बांग्लादेश सीमेवर कार्यरत असताना हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. 25 नोव्हेंबरला रात्री बाराच्या सुमारास घुगे यांना कर्तव्यावर वीरमरण आले. याची वार्ता समजताच दुसरबीडवर शोककळा पसरली.

39 वर्षीय प्रदीप घुगे यांचा जन्म दुसरबीड येथे झाला होता.शालेय शिक्षण गावातच झाले होते. 2006 मध्ये बुलढाणा येथील बीएसएफ 122 बटालियनच्या भरतीत जनरल ड्युटी (जीडी) मध्ये शिपाई पदावर त्यांची नेमणूक झाली. 31 जुलै 2024 रोजी प्रदीप घुगे गावी सुटीवर आले होते.. 45 दिवसांच्या रजेवर असताना त्यांनी कुटुंबीय, नातेवाइक, सगेसोयरे, मित्र मंडळींच्या भेटीगाठी घेतल्या. व 19 सप्टेंबर रोजी आगरतळा येथे कर्तव्यावर हजर झाले होते.

बांग्लादेशच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना 25 नोव्हेंबरला रात्री 12 वाजता त्यांना हृदयविकाराचा धक्का आला होता. त्यातच त्यांची प्राणज्योत मावलली आहे. आज त्यांच्यावर शासकीय इतमामात त्यांच्या बुलढाणा जिल्ह्यातील दुसर बीड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

Related posts

ठाण्यात होर्डिंगपासून सुरक्षिततेबाबत भाजपचे माजी गटनेते मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वात मनपा आयुक्तांना देण्यात आले निवेदन

editor

Across Mumbai 9 Jan Marathi

editor

Amit Shah Criticizes Arvind Kejriwal and Affirms India’s Stand on PoK

editor

Leave a Comment