Share
कल्याण , दि.29 नोव्हेंबर :
रेरा प्रकरणातील ६५ बेकायदा इमारतीवर कारवाईचे आदेश न्यायालयाने दिले आहे. ही कारवाई लवकर सुरु केली जाणार असल्याची माहिती केडीएमसी अधिकारी योगेश गोडसे यांनी दिली आहे.
या बाबत बोलताना सांगितले की, याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी याचिका दाखल केली आहे. ६५ बेकायदा इमारती आहेत. त्या इमारती अनधिकृती घोषित केले आहे. येत्या ३ महिन्यात या इमारती पाडण्यात यावेत असे आदेश न्यायालयाने दिले आहे. महापालिकेच्या वतीने या सर्व रहिवासियांना न्यायालयाचे आदेश आहे. ते सगळ्यांना बंधनककारक आहे. कायदेशीर बाजू मांडण्याकरीता न्यायालयात दाद मागू शकतात. १९ नोव्हेंबर रोजी न्यायालयाने दिलेली आदेश महापालिकेच्या यंत्रणेला बंधनकारक आहे. ही कारवाई आम्हाला अप्रिय असली तरी ती करण्यासाठी आम्ही बंधनकारक आहोत.