Civics

भिवंडीत 12 वर्षांनंतर भटक्या कुत्र्यांसाठी निर्बीजीकरण केंद्र पुन्हा सुरू ! पालिका आयुक्तांची माहिती

Share

भिवंडी , दि.29 नोव्हेंबर :

भिवंडी महानगरपालिकेच्या वतीने 12 वर्षांनंतर बंद पडलेले कुत्र्यांचे निर्बीजीकरण केंद्र पुन्हा सुरू करण्यात आले आहे. शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. मागील वर्षभरात 14,000 हून अधिक नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला होता, तर एका दुर्दैवी घटनेत एका व्यक्तीचा मृत्यूही झाला होता. या पार्श्वभूमीवर कुत्र्यांचे निर्बीजीकरण केंद्र तातडीने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

विशेष म्हणजे, 2012 मध्ये भिवंडीत काही कर्मचाऱ्यांकडून नऊ भटक्या कुत्र्यांना रॉकेल टाकून जाळल्याची गंभीर घटना घडली होती. या अमानुष प्रकारानंतर प्रचंड संताप व्यक्त झाला आणि निर्बीजीकरण केंद्र बंद करण्यात आले. त्यानंतर तब्बल 12 वर्षे निर्बीजीकरणाचे काम ठप्प असल्याने शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला होता.

शहरातील इदगाह रोड येथे उभारलेल्या या केंद्राचे उद्घाटन महानगरपालिका आयुक्त अजय वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले. केंद्रात 100 हून अधिक कुत्र्यांना ठेवण्याची व्यवस्था असून, त्यांच्यावर उपचार आणि निर्बीजीकरण करून त्यांना परत त्यांच्या परिसरात सोडले जाणार आहे. हैदराबादच्या ‘वेट्स सोसायटी फॉर ॲनिमल वेल्फेअर असोसिएशन’ या संस्थेला पाच वर्षांसाठी या कामाचा ठेका देण्यात आला आहे.

महत्त्वाचे म्हणजे, एका कुत्र्याचे निर्बीजीकरण करण्यासाठी सुमारे 1,450 रुपये खर्च येणार आहे. भिवंडी शहरात सुमारे 13,500 भटके कुत्रे असून त्यांच्या निर्बीजीकरणाची जबाबदारी या संस्थेकडे आहे. यामुळे शहरातील कुत्र्यांची संख्या नियंत्रणात येईल आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा उपद्रव कमी होईल, महानगरपालिकेने उचललेले हे पाऊल नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि प्राणी कल्याणासाठी महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास महापालिका आयुक्त अजय वैद्य यांनी व्यक्त केला.

Related posts

१२ हजार नावे पुरवणी मतदारयादीतून वगळली, ॲड अनिल परब यांचा आरोप

editor

शहरास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली; दुकानात पाणी शिरल्याने मोठे नुकसान

editor

मुंबई-अहमदाबाद महामार्ग,कामण-भिवंडी रस्त्या प्रकरणी आ.राजेश पाटील यांनी वेधले शासनाचे लक्ष

editor

Leave a Comment