Share
नवी मुंबई , दि.29 नोव्हेंबर :
नवी मुंबई बाजारात विविध प्रकारचे फुले दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. सध्या फुलांच्या बाजारात ग्राहकांची संख्या कमी असल्याने मंदीचे वातावरण आहे. मात्र, 4 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यामुळे या परिस्थितीत बदल होऊन विक्रीत मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता आहे.
झेंडू, शेवंती, गुलाब यांसारख्या फुलांच्या किमतीतही लक्षणीय वाढ होईल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. झेंडू सध्या 30 रुपये पाव या किमतीत मिळत असून, सणासुदीच्या कालावधीत त्याचा दर 50-60 रुपये पावपर्यंत जाऊ शकतो. शेवंती सध्या 50 रुपये पाव आहे, तर मार्गशीर्षात ती 80 रुपये पावपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा आहे. गुलाबासारख्या फुलांचे दरही मागणीच्या प्रमाणात वाढू शकतात.