Mahrashtra Uncategorized

40 वर्ष प्रकल्पाच्या नावाखाली पडीक असलेल्या शेतजमिनी पुन्हा शेतकऱ्यांच्या ताब्यात द्या, आनंदराज आंबेडकर यांची बेणसे सिध्दार्थ नगर गावातून भिमगर्जना

Share

रायगड, दि.16 डिसेंबर :

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, नागोठणे कंपनी च्या संलग्न बेणसे झोतिरपाडा ग्रामपंचायत हद्दीत नवीन प्रकल्पाची उभारणी होत आहे. मात्र रायगड जिल्हा प्रशासन, रिलायन्स व्यवस्थापन स्थानिकांच्या तक्रारींची कोणतीही दखल घेत नाही, तसेच कोणतीही न्यायिक भूमिका घेण्याऐवजी दडपशाही धोरण राबवित असल्याचा तक्रारी अर्ज प्राप्त झाल्याने रविवार दि.(15)रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू तथा रिपब्लिकन सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी बेणसे सिद्धार्थनगर येथे प्रत्यक्षात भेट देऊन विभागातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

रिलायन्स नागोठणे कंपनीच्या बेणसे सिद्धार्थ नगर लगत सुरू असलेल्या कामकाजा विरोधात बेणसे सिद्धार्थ नगर व विभागातील ग्रामस्थ व शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. यावेळी आंबेडकर यांनी 40 वर्ष प्रकल्पाच्या नावाखाली पडीक असलेल्या शेतजमिनी पुन्हा भूमिपुत्र , शेतकऱ्यांच्या ताब्यात द्याव्यात अशी भीमगर्जना आनंदराज आंबेडकर यांनी बेणसे सिध्दार्थ नगर गावातून केली. यावेळी रिलायन्सच्या नवप्रकल्पाची जागा, बेसुमार केलेली वृक्षतोड, शेतकऱ्यांचे पूर्वापार वहीवाटीचे मार्ग, संरक्षण भिंत बांधताना रस्त्यासाठी सोडलेली अरुंद जागा, बौद्धवाडीची पाण्याची टाकी ,स्मशानभूमीची जागा आदींची आनंदराज आंबेडकरांनी प्रत्यक्षात येऊन पाहणी केली. रिलायन्स समूहाने स्थानिक, भूमीपुत्रांवर अन्याय होईल अशी कोणतीही भूमिका घेऊ नये. अन्यथा स्थानिक भूमिपुत्रांच्या न्यायहक्कांसाठी भविष्यात राज्यव्यापी जन आंदोलन उभे करू असा गर्भित इशारा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकरांनी रिलायन्स नागोठणे व्यवस्थापन व जिल्हा प्रशासनाला दिला.

दरम्यान आपली शेतजमीन वाचविण्यासाठी शेतकरी योगेश अडसुळे व अन्य शेतकऱ्यांनी आंदोलनात्मक लढ्याची भूमिका घेतली. शेतकरी योगेश अडसुळे व अन्य शेतकऱ्यांच्या समस्या आंबेडकर यांनी यावेळी जाणून घेतल्या. तसेच उपोषकर्ते योगेश अडसुळे यांच्या कुटुंबियांची देखील आनंदराज आंबेडकर यांनी भेट घेतली व सर्व शेतकऱ्यांना आपण न्याय मिळवून देण्यासाठी भविष्यात मोठा लढा उभा करू अशी ग्वाही दिली.

Related posts

आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलाच्या २१ शाखांचा दहावीचा निकाल १०० टक्के

editor

महाराष्ट्राचे डिजिटल मिडिया धोरण जाहीर व्हावे, यासाठी पाठपुरावा

editor

भारतीय लष्कराच्या नाशिक इथल्या तोफखाना केंद्रातील कुमारमंगलम तोफखाना संग्रहालयाचे उद्घाटन

editor

Leave a Comment