Share
धुळे , दि.16 डिसेंबर :
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे भर दिवसा अपहरण करून नियोजित कट करून निर्घृण हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येचे संपूर्ण राज्यभरात पडसाद उमटताना पाहायला मिळत आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सखल मराठा समाजाच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
यावेळी मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी देशमुख यांची हत्या केल्याचा आरोप सकल मराठा समाजाने केला असून याप्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा करून सदर गुन्ह्याचा तपास सीबीआय किंवा एसआयटी कडे देण्यात यावा अशी मागणी या आंदोलनावेळी करण्यात आली.