Uncategorized

अमित शहांनी ” त्या “वक्तव्यातून अदानीला वाचवले

Share

मुंबई , दि.3 जानेवारी : (रमेश औताडे)

भाजप नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आंबेडकर… आंबेडकर… आंबेडकर असा जप काय करता, असा सवाल तुच्छतेने लोकसभेत केला. त्यातून नवा वाद उभा करून इतर विषयावरील प्रश्न व चर्चा थांबवत त्यांनी अदानीला वाचवले. आणि लोकसभेत त अदाणी वरील चर्चेतून भाजपचीही खुबीने सुटका केली. असा स्पष्ट आरोप संविधान तज्ज्ञ, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे अध्यक्ष डॉ. सुरेश माने यांनी केला.

मुंबईतील धारावी येथे बौद्ध, मातंग, चर्मकार कार्यकर्त्यांच्या एका संयुक्त मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. डॉ. सुरेश माने यांच्यासह दलित पँथरचे नेते सुरेश केदारे, शिक्षणतज्ज्ञ प्रा. डॉ. जी. के. डोंगरगावकर, मातंग समाजातील नेते प्रबुद्ध साठे, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ हे या मेळाव्यात मार्गदर्शक होते.

आपल्याला भरकटवून सरकारवर शेकणाऱ्या मुद्द्यांपासून भाजप पक्ष स्वतः ची सुटका करून घेत आहे. इतरांनी लादलेल्या अजेंड्यावर काम करण्याचे आपण थांबवणार आहोत की नाही ? असा सवाल यावेळी डॉ. सुरेश माने यांनी केला.

प्रास्ताविक भाषण या मेळाव्याचे एक निमंत्रक आंबेडकरवादी भारत मिशनचे संयोजक दिवाकर शेजवळ यांनी केले. तर, सूत्रसंचालन चर्मकार संघाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष विलास गोरेगावकर यांनी केले.

Related posts

पालघरमध्ये पावसाची तुफान बॅटिंग ; देहर्जे नदीवरील पूल पाण्याखाली : पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

editor

महाराष्ट्राचे डिजिटल मिडिया धोरण जाहीर व्हावे, यासाठी पाठपुरावा

editor

सॉल्ट रेस्टॉरंटच्या मालकाविरोधात दोन महिलांचे मालकी शेती वाचविण्यासाठी आमरण उपोषण

editor

Leave a Comment