Civics Mahrashtra

मुंबईतील बोरवली ते ठाणे या दुहेरी भुयारी मार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात – आमदार प्रकाश सुर्वे

Share

मुंबई, 7 जानेवारी : (सुचिता भैरे)


राज्यातील सर्वात लांब बोगदा , बोरवली ते ठाणे या दुहेरी भुयारी मार्गाचे काम गेल्या वर्षभरापासून रखडले आहे. हा भुयारी मार्ग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून जाणार असल्याने केंद्रीय वन विभागाची मंजुरीही या प्रकल्पाला मिळाली होती. परंतु या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात साधारण 650 झोपड्या या बाधित होत होत्या. त्यांच्या पुनर्वसनाचा मोठा प्रश्न सरकार समोर होता. या कारणानेच हा प्रकल्प रखडला होता.


परंतु बोरिवली ते ठाणे या दुहेरी भुयारी मार्गासाठी आमदार प्रकाश सुर्वे यांच्यासोबत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काल दिनांक 6 जानेवारी 2025, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील जागेची पाहणी केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) आयुक्तांसोबत बैठक घेऊन बाधित 325 घरांना शेजारीच हलवण्याचा निर्णय घेत बोरवली ते ठाणे या दुहेरी भुयारी मार्गाचे अडचण दूर झाल्याचे सांगितले आहे.


यावेळी आमदार प्रकाश सुर्वे म्हणाले की, बोरवली ते ठाणे दरम्यानच्या प्रवासाला दीड ते दोन तास लागायचे. त्यामुळे या प्रवासाचा कालावधी कमी करण्यासाठी बोरवली ते ठाणे या भुयारी मार्गाच्या प्रकल्पाचे प्रस्तावित आम्ही केले होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी या प्रकल्पाला मंजुरीही दिली होती. या कामाच्या पहिल्या टप्प्यात 650 झोपड्या बाधित होत होत्या. त्यांचं पुनर्वसन इथंच व्हावं ही माझी पहिल्यापासूनच मागणी होती. आणि आता, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ती मागणी मान्य केली असून, त्यांचं पुनर्वसन बाजूलाच असणाऱ्या विकासक भारद्वाज यामध्ये करण्यात येणार आहे. त्यामध्ये 325 लोकांना घरं दिली जाणार आहेत.


त्यामुळे बहुप्रतीक्षित, राज्यातील सर्वात लांब भुयारी मार्गाचे काम लवकरच सुरू होऊन बोरवली ते ठाणे हा प्रवास अवघ्या वीस मिनिटात करता येईल.

Related posts

भिवंडीत 12 वर्षांनंतर भटक्या कुत्र्यांसाठी निर्बीजीकरण केंद्र पुन्हा सुरू ! पालिका आयुक्तांची माहिती

editor

अदित्य ठाकरेंचा जोगेश्वरीत दणदणीत रोड शो

editor

फिरत्या वाहनावरील दुकान योजनेचा लाभ घेण्याचे दिव्यांगांना आवाहन

editor

Leave a reply

  • Default Comments (0)
  • Facebook Comments