International Mahrashtra national

विधान परिषद सभापती निवड झाल्याबद्दल जपानच्या महावाणिज्यदूतांनी घेतली प्रा. राम शिंदे यांची सदिच्छा भेट

Share

मुंबई, दि.16 जानेवारी :

जपानचे भारतातील महावाणिज्यदूत यागी कोजी यांनी आज विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. सभापती पदी निवड झाल्याबद्दल कोजी यांनी प्रा. शिंदे यांचे अभिनंदन केले.

सभापती प्रा. राम शिंदे यांनी महावाणिज्यदूत कोजी यांचे स्वागत केले. यावेळी विधिमंडळाचे सचिव विलास आठवले उपस्थित होते.

 जपान भारत यांचे मैत्रीचे संबंध आहेत. महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्यामध्ये विविध पायाभूत प्रकल्पांमध्ये जपान सहभागी असल्याचा आपल्याला आनंद आणि अभिमान असल्याचे कोजी यांनी यावेळी सांगितले. तसेच मेट्रोच्या उभारणीत जपान संपूर्ण सहकार्य करीत असून लवकरच ते काम पूर्णत्वास येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रा. शिंदे यांनी पर्यटन मंत्री असताना एप्रिल 2016 मध्ये दिलेल्या जपान भेटींना उजाळा दिला. त्यावेळी प्रा. शिंदे यांनी याकोहामा मधील कोयासान विद्यापीठात दिलेल्या भाषणांची आठवण सांगितली. तसेच जपानच्या सहकार्याबद्दल आनंद व्यक्त केला.

Related posts

महाराष्ट्रात भाजपाला देवेंद्रजींचेच नेतृत्व ; चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

editor

मुंबईत होणार जागतिक मनोरंजन क्षेत्राचे ‘वेव्ज २०२५’ संमेलन

editor

“Arvind Kejriwal Challenges Arrest in Delhi High Court Over Excise Policy Case”

editor

Leave a Comment