Business Mahrashtra

महाराष्ट्रातील शासकीय औद्योगिक संस्थाच्या नामकरणास शासनाची मान्यता ; औद्योगिक संस्थांना मिळणार नवी ओळख

Share

मुंबई, दि.15 जानेवारी :

महाराष्ट्रातील १३२ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण यशस्वीपणे करण्यात आले आहे. प्रथम १४ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाद्वारे घेण्यात आला होता. महाराष्ट्रातील फक्त २ औद्योगिक संस्था सोडल्या तर इतर औद्योगिक संस्थांना या आधी कोणत्याही प्रकारची नावे नव्हती. त्यानंतर कौशल्य विकास विभागाद्वारे महाराष्ट्रातील शासकीय औद्योगिक संस्थांसाठी नागरिकांकडून नावांबाबत सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे राज्यातील १३२ आयटीआयचे नामकरण करण्याचा निर्णय आज जाहीर करण्यात आला. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ही माहिती दिली.

त्यानुसार अकोला ,अमरावती, कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, छत्रपती संभाजी नगर, जळगाव ,जालना धाराशिव, धुळे, नंदुरबार, नागपूर नांदेड, नाशिक, परभणी, बीड, बुलढाणा, भंडारा, मुंबई उपनगर, यवतमाळ रत्नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, वाशिम, सांगली, सातारा, सोलापूर आणि हिंगोली जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक संस्थांना नवीन ओळख मिळाली याबाबतचा सविस्तर निर्णय शासनाच्या संकेतस्थळावर आजच प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Related posts

आदिवासींच्या प्रश्नांवर राजकारणापलीकडे विचार झाला पाहिजे – राज्यपाल राधाकृष्णन

editor

कल्याणमध्ये वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे वृद्ध महिलेला जीवनदान

editor

शासनाचा ढीला कारभार ,मुख्यमंत्र्यांना तब्बल १७ दिवसांनी जाग

editor

Leave a Comment