Civics health Mahrashtra

राज्य कामगार विमा सोसायटीच्या रुग्णालयांमधून कामगारांसाठी दर्जेदार आरोग्य सुविधा द्याव्यात- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

Share

मुंबई, दि.15 जानेवारी :

राज्य कामगार विमा सोसायटी कामगारांसाठी आपल्या १२ रुग्णालयांच्या माध्यमातून आरोग्य सुविधा देत असते.  राज्यात विमाधारक कामगारांची ४८ लाख ७० हजार ४६० कुटुंब आहेत. लाभार्थी संख्या जवळपास दोन कोटी पर्यंत आहे.  विमा सोसायटीने विमाधारक कामगारांसाठी या रुग्णालयांमधून दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज दिले.

राज्य कामगार विमा सोसायटीने मिळणाऱ्या निधीचा रुग्ण सेवेसाठी पुरेपूर उपयोग करावा.  या निधीतून आरोग्य व्यवस्था बळकट करावी.  तसेच संलग्न केलेल्या 253 रुग्णालयांमधील उपचारांची कामगारांना माहिती होण्यासाठी जनजागृती करावी. रिक्त जागा भरण्यासाठी आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी,  अशा सूचनाही मंत्री आबिटकर यांनी दिल्या. 

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीचा आढावा मंत्री आबिटकर यांनी आरोग्य भवन येथे आयोजित बैठकीत घेतला. बैठकीस आरोग्य सेवा आयुक्त श्री रंगा नायक, राज्य कामगार विमा सोसायटीचे संचालक (वैद्यकीय) शशी कोळनुरकर,  सहसचिव लहाने, सहसंचालक तुलसीदास सोळंके उपस्थित होते.

आरोग्य मंत्री म्हणाले, राज्य कामगार विमा सोसायटीच्या शिखर समितीची बैठक तातडीने घेण्यात यावी. सोसायटीच्या नव्याने मंजूर 18 रुग्णालयांसाठी भूसंपादन पूर्ण करावे. राज्य कामगार विमा सोसायटीने मागील तीन वर्षातील कार्य अहवाल सादर करावा. सद्यस्थितीत असलेल्या कामगार रुग्णालयांची डागडुजी करून त्यांचा मेक ओव्हर करावा.  सोसायटीच्या रुग्णालयांची जागा अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी आहे,  अशा ठिकाणी आरोग्य सुविधा उपलब्ध केल्यास कामगारांना महागड्या खाजगी रुग्णालयांमधून उपचार घ्यावे लागणार नाही.  दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या कामगारांसाठी ही रुग्णालये संजीवनी आहेत. सोसायटीच्या कामकाजाचा  दरमहा आढावा घेण्यात यावा. या सोसायटीच्या रुग्णालयांमधून गतिमान वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचनाही मंत्री आबिटकर यांनी दिल्या.

सोसायटीचे संचालक कोळनुरकर यांनी यावेळी सादरीकरण केले. बैठकीला संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Related posts

टॅक्सी विहिरीत पडून झालेल्या अपघातात सात जणांचा दुर्दैवी मृत्यू, अपघाताची मुख्यमंत्र्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा

editor

ब्राह्मण समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी महामंडळाने गतीने काम करावे – डॉ. गोऱ्हे

editor

महाराष्ट्रातील शासकीय औद्योगिक संस्थाच्या नामकरणास शासनाची मान्यता ; औद्योगिक संस्थांना मिळणार नवी ओळख

editor

Leave a Comment