Civics Mahrashtra

कागल, पिंपळगाव खुर्द, येथे उभारण्यात येणार नवीन शासकीय होमिओपॅथी विद्यालय

Share

मुंबई, दि. १६ जानेवारी :

कोल्हापूर जिल्ह्यामधील कागल तालुक्यातील नवीन शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयास मौजे सांगाव ऐवजी पिंपळगाव खुर्द येथील जमीन निःशुल्क उपलब्ध करून देण्यास आज झालेल्या मंत्री परिषदेच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

कागल तालुक्यातील मौजे सांगाव येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व संलग्नित ५० रूग्णखाटांचे रुग्णालय स्थापन करण्यास ४ ऑक्टोबर २०२४ च्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली होती. तथापि राष्ट्रीय होमिओपॅथी आयोग, नवी दिल्ली यांच्या मानकांनुसार मौजे सांगाव येथे या होमिओपॅथी महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयासाठी पुरेशी, सलग व सुयोग्य जागा उपलब्ध नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आता पिंपळगाव खुर्द ( ता. कागल) येथील गट क्र.४८७ मधील गायरान जमीनीपैकी ५.७५ एकर जमीन उपलब्ध करून देण्यास आज झालेल्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. ही जमीन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागास निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Related posts

AAP’s Arvind Kejriwal Faces BJP Allegations, Colleague Responds at Joint Press Conference

editor

मोदी सरकारने नेहमीच कनिष्ठ आणि मध्यमवर्गीयांच्या कल्याणाची धोरणे राबवली: पियुष गोयल

editor

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून नव्या चेहऱ्यांना संधी : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची माहिती

editor

Leave a Comment