Civics Mahrashtra

भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांची ग्वाही : पालिकेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या घरांसंदर्भात आगामी अधिवेशनात प्रश्न मांडणार

Share

मुंबई , दि.22 जानेवारी :

मुंबई महापालिकेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना हक्काचे घर मिळावे यासंबंधी आगामी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याची ग्वाही भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी दिली आहे. चेंबूर येथे मुंबई महापालिकेतील विविध खात्यातील कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी ‘आपला संचालक-विष्णू घुमरे चषक २०२५’ भव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी आ. दरेकर यांनी हे आश्वासन दिले.

मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या स्पर्धेचा महापालिकेचे कर्मचारी, अधिकारीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळले जावे व क्रीडा गुणांना वाव मिळावा हा उद्देश होता. या क्रिकेट स्पर्धेत आ. प्रविण दरेकर यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे पारितोषिक ५० हजार रूपये व बाहुबली चषक एच-पश्चिम विभाग, २५ हजार रूपयांचे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक व बाहुबली चषक अतुल इलेव्हन, मुलुंड या संघांना देऊन गौरविण्यात आले. तर मालिकावीर २५००, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज यांना प्रत्येकी दोन हजार रूपये आणि प्रत्येक सामनावीरला टी-शर्ट देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना आ. प्रविण दरेकर यांनी महापालिका कर्मचारी व अधिकारी यांना शुभेच्छा देऊन आगामी अधिवेशनात मुंबई महापालिकेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना हक्काचे घर मिळवून देण्यासंबंधी प्रश्न उपस्थित करणार असल्याचे आश्वासित केले.

सदर स्पर्धेचे आयोजन म्युनिसीपल बँक संचालक विष्णू घुमरे, वर्षा माळी, मुकेश घुमरे यांनी केले होते. यावेळी माजी आमदार कांताताई नलावडे, भाजपा नेते अनिल ठाकूर, जगदीश पराडकर, ज्येष्ठ भाजपा नेते धर्मवीर पांडे, राजश्री पांडे, राजाराम उपाध्याय, नगरसेवक सुषम सावंत, मुंबई बँकेचे संचालक विठ्ठल भोसले, एससी सेल मुंबई अध्यक्ष शरद कांबळे, उपाध्यक्ष रमेश डुलगच यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.

Related posts

हरित महाराष्ट्र करणे हीच वसंतराव नाईक यांना खरी श्रद्धांजली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

editor

लाडकी बहिण योजना कधीही बंद केली जाणार नाही ; देवा भाऊंचे लाडक्या बहिणींना आश्वासन

editor

वडीगोद्री येथे सुरू असलेल्या ओबीसी आरक्षण बचाव आमरण उपोषणाला सरकारच्या शिष्टमंडळाची भेट

editor

Leave a Comment