Civics Mahrashtra

गोरेगाव स्थित टोपीवाला महानगरपालिका मंडईतील गाळेधारकांच्या पुनर्वसनाला प्राधान्य द्यावे, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचे निर्देश

Share

मुंबई, दि. २३ जानेवारी :

गोरेगाव पश्चिम येथील प्रस्तावित टोपीवाला महानगरपालिका मंडईला महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी आज (दिनांक २३ जानेवारी २०२५) भेट देत बांधकामाची पाहणी केली. गाळेधारकांना वापरासाठीची जागा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही वेगाने पूर्ण करावी तसेच गाळेधारकांच्या पुनर्वसनासाठी प्राधान्य द्यावे अशा सूचना गगराणी यांनी यावेळी दिल्या.

स्थानिक आमदार विद्या ठाकूर, उपआयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, संचालक (अभियांत्रिकी) गोविंद गारूळे, नगर अभियंता महेंद्र उबाळे, सहायक आयुक्त (बाजार) मनीष वळंजू, सहायक आयुक्त (पी उत्तर) संजय जाधव, उप प्रमुख अभियंता यतीश रांदेरिया, कार्यकारी अभियंता प्रीतम सातर्डेकर यांच्यासह संबंधित अधिकारी, अभियंता यावेळी उपस्थित होते.

टोपीवाला महानगरपालिका मंडईचा पुनर्विकास महानगरपालिकेने हाती घेतला आहे. गोरेगाव पश्चिम येथील मौजे पहाडी गोरेगाव येथे उभारण्यात येणारी ही इमारत १६ मजली आहे. या इमारतीत ८०० आसन क्षमतेच्या सुसज्ज नाट्यगृहाचा समावेश आहे. मंडईत एकूण २०६ गाळे असतील. त्यात तळ मजल्यावर ११२ गाळे आणि पहिल्या मजल्यावर ९४ गाळ्यांचा समावे‌श आहे. याचबरोबर इमारतीत एकूण ५३ रहिवासी सदनिकांची तरतूद करण्यात आली आहे. तर, १९२ वाहनांसाठी वाहनतळ उपलब्ध असेल. छतावर मनोरंजन सुविधा आणि खेळासाठी जागा आरक्षित आहे. या इमारतीचा पुनर्विकास ३० महिन्यांच्या कालावधीत करण्याचे नियोजित आहेत. सुमारे ३ हजार ४३८ चौरस मीटर क्षेत्रफळावर आकर्षक अशी ही इमारत उभारण्यात येत आहे.

स्थळ पाहणी केल्यानंतर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक गगराणी म्हणाले की, गाळेधारकांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी इमारतीची बांधकाम प्रक्रिया वेगाने करावी. येत्या वर्षभरात ही जागा वापरासाठी यावी म्हणून प्रकल्पाशी संबंधित बाबींची अंमलबजावणी करावी. गाळेधारकांना दिलासा म्हणून पुनर्वसनाच्या अनुषंगाने सुरूवातीच्या टप्प्यात दोन मजल्यांचे बांधकाम पूर्ण करावे, जेणेकरून गाळेधारकांना ही जागा व्यवसायासाठी वापरणे शक्य होईल, असेही गगराणी यांनी सांगितले.

Related posts

अधिकाधिक लोकांनी नेत्रदान करण्याचा संकल्प करावा – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

editor

भर पावसाळ्यात ६५ लाख मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात

editor

अनधिकृत लॅब बाबत विधानसभेत फक्त चर्चाजनतेची लूट व आरोग्याशी खेळ सुरूच

editor

Leave a Comment