मुंबई ,दि.27 जानेवारी : रमेश औताडे
भारतातील प्रतिष्ठित फंड घराण्यांपैकी एक असलेल्या एलआयसी म्युच्युअल फंडाने ” एलआयसी एमएफ मल्टी एसेट एलोकेशन फंड” ची घोषणा केली आहे. ही एक गुंतवणुकीस कायम खुली असणारी योजना असून, समभाग, रोखे आणि सोन्यांत गुंतवणूक करणारी योजना आहे.
एलआयसी म्युच्युअल फंड एसेट मॅनेजमेंट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. झा यांनी मुंबईत पत्रकार परिषद याबाबत माहिती दिली. निखिल रुंगटा, सुमित भटनागर आणि प्रतीक श्रॉफ हे योजनेचे निधी व्यवस्थापक असतील.
हा नवीन फंड २४ जानेवारी २०२५ रोजी सुरू होईल आणि ७ फेब्रुवारी २०२५ रोजी बंद होईल. या योजनेचे गुंतवणूक उद्दिष्ट समभाग व समभागांशी संलग्न साधनांच्या विविध पोर्ट फोलिओमध्ये, रोखे आणि मनी मार्केट साधनांमध्ये तसेच गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडाच्या युनिट्समध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन भांडवलवृद्धी करण्याचे आहे.
या योजनेचा मानदंड हा ६५ टक्के निफ्टी ५०० टीआरआय पेक्षा जास्त २५ टक्के निफ्टी कंपोझिट डेट इंडेक्स व देशांतर्गत सोन्याची १० टक्के किंमत यांचे संयोजन असून ही योजना १८ फेब्रुवारी २०२५ रोजी निरंतर विक्री आणि पुनर्खरेदीसाठी पुन्हा खुली होईल.
यावेळी आर. के. झा म्हणाले, “मल्टी-एसेट एलोकेशन फंड हे आजकाल अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. कारण ते एकाच मालमत्तेतील केंद्रीकरणाची जोखीम कमी करतात आणि गुंतवणुकीत चांगले वैविध्य कसे राहिल याकडे लक्ष देतात.
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया ने प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये हायब्रिड म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापना खालील मालमत्तेत २७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, हायब्रिड श्रेणी अंतर्गत मल्टी-एसेट ए लोकेशन फंडाच्या मालमत्तेत लक्षणीय वाढ दिसून आली आहे.
यातून गुंतवणूकदारांचे सध्या हायब्रिड फंडांकडे आकर्षण स्पष्टपणे दिसून येत आहे आणि आमचा नवीन फंड त्यांच्या हितसंबंधांच्या पूर्ततेसाठी निश्चितच आदर्श आहे.
एलआयसी म्युच्युअल फंड एसेट मॅनेजमेंट लिमिटेडचे सह-मुख्य गुंतवणूक अधिकारी निखिल रुंगटा म्हणाले, “मल्टी-एसेट एलोकेशन फंड” हा एक असा उपाय आहे जो वाढीसाठी समभागांची शक्ती, रोख्यांद्वारे उत्पन्न निर्मिती आणि कमोडिटीजची कणखरता यांचे उत्तम संयोजन साधणारा आहे.