Uncategorized

महाराष्ट्राचे डिजिटल मिडिया धोरण जाहीर व्हावे, यासाठी पाठपुरावा

Share

संघटनेच्या मुंबईतील बैठकीत राजा माने यांची माहिती

मुंबई , दि.15 फेब्रुवारी :

राजस्थान सरकारप्रमाणेच महाराष्ट्र सरकारनेही डिजिटल मिडिया धोरण लागू करावे, यासाठी संघटनेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याची माहिती डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांनी दिली. मुंबईच्या मालाड येथील राजोरा बँक्वेट हॉल येथे राजा मानसाहेबांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई शहर व उपनगरातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत मार्गदर्शन करताना माने यांनी संघटनेचा इतिहास, राज्यभर वाढलेली व्याप्ती, पत्रकारांच्या कुटुंबियांसाठी सुरू करण्यात आलेल्या प्रतिबिंब प्रतिष्ठानची माहिती दिली. तसेच, संघटनेच्या 6 एप्रिल रोजी होणाऱ्या अधिवेशनासह संघटनेची पुढील दिशा सांगितली.

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष संजय भैरे यांच्या नेतृत्वात मुंबईत कार्यरत असलेल्या डिजीटल मिडिया पत्रकार व संपादकांच्यावतीने राजा माने यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी, अनेक मान्यवर व स्थानिक पत्रकार उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना, माने यांनी डिजिटल मिडिया धोरण व प्रतिबिंब प्रतिष्ठानबद्दल माहिती दिली. आपल्या संघटनेचा पत्रकार कुटुंबवत्सल असला पाहिजे, उद्योगी (व्यवसायिक) असला पाहिजे, पण खंडणीखोर अजिबात असता कामा नये. कारण, संघटनेच्या माध्यमातून डिजिटल मीडियातील पत्रकारांना आता कुठे प्रतिष्ठा मिळत आहे, समाजमान्यता मिळत आहे, शासन मान्यताही लवकरच मिळेल. त्यासाठी, संघटनेचे सर्व पदाधिकारी जोमाने तालुका ते मंत्रालय स्तरावर धडक देत आहेत. संघटनेचा अध्यक्ष मी असलो तरी संघटनेचं काम हे आपण, आम्ही म्हणूनच पुढे जात आहे. संघटनेचा प्रत्येक घटक इथे महत्त्वाचा आहे. त्याच माध्यमातून, डिजिटल मिडिया धोरण राबवण्यासाठी आपण पाठपुरावा करत असल्याचे मानेसाहेबांनी सांगितले.

वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार

संघटनेचे मुंबई अध्यक्ष संजय भैरे यांनी माने यांच्या वाढदिवसानिमित्त संगीत सकाळ आणि स्नेहभोजनाचाही कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी, मुंबईतील कामगार संघटनेचे नेते अभिजीत राणे, डिजिटल मिडिया संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य मयूर गलांडे, ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल वाघुले, सचिव यतीन पवार, मुंबई विभागातील पदाधिकारी,विविध संघटनांचे पदाधिकारी, स्थानिक पत्रकार आणि मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी अध्यक्ष भैरे यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त करताना मानेंच्या पत्रकारितेतील प्रवासाचे आणि संघटनेच्या वाटचालीचे विशेष कौतुक केले.

Related posts

परभणीतील घटनेच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर शहरात आंदोलन

editor

सॉल्ट रेस्टॉरंटच्या मालकाविरोधात दोन महिलांचे मालकी शेती वाचविण्यासाठी आमरण उपोषण

editor

करवंद घ्या करवंद च्या आरोळ्या घुमू लागल्या

editor

Leave a Comment