Mahrashtra

शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारी वाघनखे पाहण्यासाठी सातारकरांची उडाली झुंबड

Share

सातारा प्रतिनिधि , दि. २० :

छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनख्याच्या सहाय्याने अफजलखानाचा वध केला.ती शिवकालीन वाघनखे प्रदर्शनासाठी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात आणण्यात आली आहेत. ती पाहण्यासाठी आता नागरिकांची मोठी झुंबड उडाली असून राज्यभरातून शेकडो नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला भेट देऊन या वागणकांची पाहणी केली आहे. तर साडेतीन वर्षांपूर्वीची ही वाघ नखे पाहताना सर्व शिवप्रेमी मध्ये एक उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचं पहिला मिळाले.


पुरातन इतिहासातील अनमोल ठेवाच याची देहा याची डोळा पाहिला मिळाल्याने नागरिकांनी राज्य सरकारचे आभार व्यक्त केले आहेत.
कालच या वाघनखांच्या प्रदर्शन दालनाचे शाही थाटात उदघाटन पार पडले आणि आजपासून ही वाघनखे प्रदर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत. दररोज सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही वाघनखे सर्व नागरिकांना पाहता येणार आहेत. तर यासाठी संग्रहालय प्रशासनाकडून दहा रुपये इतके मूल्य आकारले जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी हा अनमोल ठेवा पाहण्यासाठी संग्रहालयाला भेट द्यावी, असे आव्हान देखील संग्रहालय प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related posts

मुंबईत होणार जागतिक मनोरंजन क्षेत्राचे ‘वेव्ज २०२५’ संमेलन

editor

सोशल मिडियावर बदनामीकारक पोस्ट व्हायरल केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

editor

आघाडीने वंचितला जाणीवपूर्वक डावलले : प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

editor

Leave a Comment