Finance and Markets

चांगला, दूरदृष्टीपूर्ण, लोककल्याणकारी अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री अजित पवार

Share

मुंबई, दि. २३ प्रतिनिधी :

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सलग तिसऱ्या एनडीए सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प महाराष्ट्र आणि देशवासियांची मने जिंकणारा अर्थसंकल्प ठरला आहे. मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गाच्या आशा-आकांक्षा-अपेक्षांची पूर्तता करणारा, शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, सहकार, रोजगार, स्वयंरोजगार, विज्ञान, संशोधन, कौशल्यविकास, सामाजिक न्याय, महिला सक्षमीकरण अशा सर्व क्षेत्रांच्या विकासाला बळ देणारा, मजबूत-विकसित भारताची पायाभरणी करणारा, देशाला विश्वशक्ती बनवण्याच्या वाटेवर नेणारा हा अर्थसंकल्प आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.

शहरी व ग्रामीण विकासाचा समतोल साधणारा, समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित, मागास, अल्पसंख्याक घटकांच्या विकासावर भर देणारा एक चांगला, दूरदृष्टीपूर्ण, लोककल्याणकारी अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.एनडीए सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावरील देशवासियांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी देशाला विकसित राष्ट्र, विश्वशक्ती बनविण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीए सरकारचे स्वप्न आहे. स्वातंत्र्याच्या शतकमहोत्सवाआधी हे स्वप्न पूर्ण करायचे आहे. या स्वप्नपूर्तीसाठी दूरदृष्टीने हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे.शेती क्षेत्रात उत्पादकतावाढ, रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्यविकासावर भर, मनुष्यबळ विकास व सामाजिक न्यायाकडे विशेष लक्ष, उत्पादन व सेवाक्षेत्राचा विकास शहरांच्या नियोजनबद्ध विकासावर भर, ऊर्जासंरक्षण पायाभूत सुविधांचा विकास संशोधन व विकासाला प्राधान्य, नव्या पीढीसाठी सुधारणा या ९ क्षेत्रांना दिलेले प्राधान्य देशाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा, देशाला सर्व क्षेत्रात पुढे घेऊन जाणारा निर्णय आहे असेही अजित पवार यांनी सांगितले.

शेती व संलग्न क्षेत्रांसाठी १.५२ लाख कोटींची केलेली तरतूद महत्वाची आहे. त्यातून शेती क्षेत्रासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यात येणार आहे. कमी खर्चात, अधिक उत्पादन देणाऱ्या शास्त्रशुद्ध शेतीचा प्रचार-प्रसार देशाच्या शेतीक्षेत्राला आणि शेतकऱ्यांना बळ देणारा ठरेल. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत ५ वर्षांसाठी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे देशातील ८० कोटी नागरिकांना अन्नसुरक्षा मिळाली आहे.

युवकांना शिक्षण, रोजगार आणि कौशल्य विकासासाठी १.४८ लाख कोटींची तरतूद केली आहे. त्यातून येणाऱ्या ५ वर्षात २० लाख युवकांना कौशल्यविकासाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ‘ईपीएफओ’मधील नोंदणीवर आधारित योजनेंतर्गत, पहिल्यांदाच रोजगारासाठी तयार झालेल्या युवकांना १ महिन्याचा भत्ता पहिल्या महिन्यात दिला जाणार आहे. २१ कोटी युवकांना याचा फायदा होणार आहे. पुढील ५ वर्षात देशातील ५०० कंपन्यांमध्ये किमान १ कोटी युवकांना इंटर्नशिपची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. देशात १२ इंडस्ट्रीयल पार्क उभारण्यात येणार आहेत. त्याचा फायदा महाराष्ट्रालाही होईल असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला.

Related posts

एल आय सी म्युच्युअल फंडाच्या बहुपर्यायी योजनेचा शुभारंभ

editor

PM Modi Upbeat on Economic Reforms, Stock Market Pre-Election

editor

अर्थसंकल्पातून ग्रामीण भारताच्या विकासाचा पाया मजबूत होईल-महसूल मंत्री विखे पाटील

editor

Leave a Comment