Mahrashtra

अंबानी कुटुंबातर्फे सामुहिक विवाह सोहळा थाटात संपन्न

Share

पालघर प्रतिनिधी , ४ जुलाई :

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न येत्या १२ जूलैला पार पडणार आहे. त्यामुळे चाहत्यांनीही उत्सुकता आहे. त्यामुळे अंबानी कुटुंबीय चर्चेत आलं आहे. यावेळी त्यांनी ५० गरीब जोडप्यांचा सामुहिक विवाह अगदी थाटात लावला आहे. याचे व्हिडीओ, फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी अंबानी कुटुंबियांनी स्वत:हून हजेरी लावलेली होती आणि यावेळी त्यांनी जोडप्यांना आशीर्वादही दिला होता.या गरीब जोडप्यांची लग्नगाठ बांधल्यामुळे अंबानी कुटुंबियांचे सर्वत्र कौतुक होताना दिसते आहे.


अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनच्या निमित्तानेच अंबानी कुटुंबियांनी या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केलं होतं. काल (२ जूलै) सायंकाळी ४.३० वाजता पालघर येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर येथे हा सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या सामूहिक विवाह सोहळ्याला स्वतः मुकेश अंबानी, नीता अंबानी, आकाश अंबानी, श्लोका अंबानी, ईशा अंबानी, आनंद पिरामल उपस्थित होते. मोठ्या थाटामाटात आणि पारंपरिक पद्धतीने अंबानींनी ५० गरीब जोडप्याचं लग्न करून दिलं. यावेळी अंबानी कुटुंबियांचा साधेपणा पाहायला मिळाला. नीता अंबानी यांनी यावेळी सुंदर लाल रंगाची काठपदराची साडी परिधान केली होती. या व्हिडीओमध्ये अंबानी कुटुंबातील सदस्य नवविवाहित जोडप्यांना आशीर्वाद देताना दिसत आहेत.तसेच मुकेश अंबानी पांढऱ्या रंगाच शर्ट व काळ्या रंगाची पँट अशा साध्या वेशात पाहायला मिळाले.यावेळी अंबानी कुटुंबियांनी भेट म्हणून जोडप्यांना सोन्या-चांदीचे दागिने देखील देण्यात आले. मंगळसूत्र, कानातले, अंगठी असे सर्व काही दागिने गरीब जोडप्यांना अंबानी कुटुंबीतील सदस्यांच्या हस्ते दिलं. याशिवाय आहेर देऊन अंबानी कुटुंबाने सर्व जोडप्यांना आशीर्वाद दिला. विशेष म्हणजे सामूहिक विवाह सोहळ्यात मराठी लग्नाची गाणी लावण्यात आली होती. पालघर येथे पार पडलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यातील सध्या अनेक व्हिडीओ समोर आले आहेत.

Related posts

भारतीय लष्कराच्या नाशिक इथल्या तोफखाना केंद्रातील कुमारमंगलम तोफखाना संग्रहालयाचे उद्घाटन

editor

कोस्‍टल रोडच्‍या बाजूची मोकळी जागा बिल्‍डरांना देण्‍याचा घाट होता का ?

editor

लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासन सज्ज

editor

Leave a Comment