विरार प्रतिनिधी , ४ जुलाई :
मुंबई अहमदाबाद महामार्गाचे काँक्रिटीकरण वाहतुकदारांसाठी अवघड जागेवरचे दुखणे ठरले असताना त्यात महामार्गाच्यथा चिखलमय अवस्थेचा मनस्ताप वाहतुकदारांना सोसावा लागत आहे. त्यातच रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यातून गाडी चालवणे अवघड होऊन बसले आहे.या रस्त्यावरून अर्ध्या तासाच्या प्रवासाला दोन ते तीन तास लागत असल्याने इंधनाची ,वेळेचा अपवय आणि मनस्ताप प्रवाशां सहन करावा लगत आहे.तर दुसऱ्या बाजूला कामण भिवंडी रस्त्यासाठी येथील नागरिक गेली कित्येक वर्ष पासून आंदोलन करत असली तरी त्याला यश आलेले नाही. आता तर पावसाळ्यात हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा म्हणून ओळखला जात आहे.
त्यामुळे या दोन्ही रस्त्या बाबत शासनाने तातडीने कारवाई करण्याची मागणी करून बोईसरचे आमदार राजेश पाटील यांनी आज पावसाळी अधिवेशनाचे मध्ये शासनाचे लक्ष वेधून घेतले. यावर विधान सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला यात तातडीने लक्ष घालून हा प्रश्न सोडविण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरु आशयाने रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे. तर दुसऱ्या बाजूला कामण भिवंडी रस्ता हि मृत्यूचा सापळा झाला आहे.
या रस्त्ययासाठी येथील नागरिकांनी अनेक आंदोलने केली असली तरी त्याला अजून यश आले नाही. आता तर हा रस्ता इतका खराब झाला आहे, कि दर दोन दिवसांनी या रस्त्यावर अपघात होत आहेत.हि सगळी परिस्तिथी आज बोईसरचे आमदार राजेश पाटील यांनी पावसाळी अधिवेशनात सभागृच्या माध्यमातून शासना पुढे आणून यावर तातडीने उपाय योजना करण्याची मागणी करत सभागृहा बरोबरच शासनाचेही लक्ष वेधून घेतले.यापूर्वी महामार्ग आणि भिवंडी कामण रस्त्यासाठी बविआचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालक मंत्री आणि बांधकाम मंत्री याना याबाबत पत्रेही दिली आहेत. तर भिवंडी कामण रस्त्यावरील खड्ड्या मुले चार दिवसापूर्वी एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. आता तर या रस्त्यासाठी येथील नागरिक न्यायालयात जाण्याची तयारी करत आहेत.मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती आहे. डहाणू पासूनच्या रुग्णांना मुंबईला आणायचे असेल तर हा महामार्ग जरी असला तरी सद्या महामार्गावर खड्ड्या मुले वाहतुकीची कोंडी होत असल्याने रुग्ण मुंबईतील रुग्णालयात पोहोचेल याची ‘गॅरंटी’ देता येत नसल्याची बाबा आमदार राजेश पाटील यांनी यावेळी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर ह्या महत्वाच्या प्रश्नांची दखल घेत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शासनाने या प्रश्नात तातडीने लक्ष घालून सोडवण्याचे निर्देश दिले आहेत.