Uncategorized

ठाण्यात होर्डिंगपासून सुरक्षिततेबाबत भाजपचे माजी गटनेते मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वात मनपा आयुक्तांना देण्यात आले निवेदन

Share

ठाणे,२८ मे :

घोडबंदर रोड परिसरात मुख्य रस्ते, इमारती, इलेक्ट्रिक टॉवर आणि महत्वाच्या चौकात उभारण्यात आलेल्या होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याबरोबरच बेकायदा होर्डिंग तत्काळ काढून टाकावीत त्याचबरोबर होर्डिंगपासून नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात महापालिकेने नियमावली तयार करावी, अशी मागणी भाजपाचे माजी गटनेते मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या वेळी भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार, भरत चव्हाण यांचीही उपस्थिती होती. घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील मुख्य रस्ते, इमारती, इलेक्ट्रिक टॉवर आणि महत्वाच्या चौकामध्ये उभारलेल्या होर्डिंगची तपासणी करण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षांत जाहिरातील आलेल्या महत्वामुळे ठिकठिकाणी होर्डिंग उभारली गेली. काही ठिकाणी महापालिकेच्या नियमाची पायमल्ली करीत बेकायदा पद्धतीने होर्डिंग थाटली गेली. काही ठिकाणी कमी जागेची परवानगी घेऊन मोठी होर्डिंग लावण्यात आली असल्याच्या तक्रारी आहेत. शहरातील काही ठिकाणी अनधिकृत व धोकादायक इमारतींवरही होर्डिंग असल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो, अशी भीषण परिस्थिती आहे.

घोडबंदर रोडवर दोन इलेक्ट्रिक टॉवरला वेल्डिंग करून होर्डिंग उभारण्यात आला आहे, याकडे आयुक्त राव यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले. या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून तपासणी करावी. तसेच बेकायदा होर्डिंग काढून टाकून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उंचावरील होर्डिंगची नियमित तपासणी करावी. तसेच भविष्यात होर्डिगपासून नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात नियमावली तयार करावीत अशी मागणी माजी गटनेते मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली.

Related posts

अमित शहांनी ” त्या “वक्तव्यातून अदानीला वाचवले

editor

लातूर जिल्ह्यासाठी 20 हजार मेट्रिक टन सोयाबीन खरेदीला मंजुरी

editor

मतपेट्या ठेवण्यात आलेल्या शासकीय ठिकाणी तगडा पोलिस बंदोबस्त

editor

Leave a Comment