accident Mahrashtra

ठाण्यातील इस्टर्न एक्सप्रेस हायवे लगत असणाऱ्या मॉल समोर भीषण अपघात

Share

ठाणे, ६ जून :

ठाण्यातील इस्टर्न एक्सप्रेस हायवे लगत असणाऱ्या विवियाना मॉल समोरील उड्डाण पुलावर दुपारच्या सुमारास चार ते पाच वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. एक ट्रक रस्त्याच्या कडेला थांबला असल्याने त्या पाठोपाठ चार वाहने येऊन या ट्रकला धडकले आहेत.यामध्ये व्हॅगनार कार चालक जबरी जखमी झाला असून कारचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे व इतर वाहन चालकांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत.

अपघातामुळे ठाण्याहून भिवंडी व घोडबंदर कडे जाणाऱ्या मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. ठाणे आपत्ती व्यवस्थापन व ठाणे वाहतूक विभागाच्या वतीने सदरची वाहने बाजूला करण्यात आली असून वाहतूक कोंडी पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे.

Related posts

राहुल गांधी यांनी अमेठी ऐवजी रायबरेलीतून आपला उमेदवारी अर्ज केला दाखल

editor

सोळा जीव घेतल्यानंतरही रेल्वेला गांभीर्य नाही

editor

आमदार पी. एन. पाटील यांचं निधन, वयाच्या 71 वर्षी घेतला अखेरचा श्वास

editor

Leave a Comment