भिवंडी , दि.28 नोव्हेंबर :
पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी भिवंडी शहरात विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे . या स्वच्छता मोहिमेंतर्गत प्लास्टिक मुक्त भिवंडी करण्याचा देखील संकल्प केला असून यामध्ये सिंगल युज प्लास्टिक वापर करू नये अशा शासनाच्या सूचना आहेत व त्यानुसार पालिकेने अधिनियम पारित केले आहेत.
त्यानुसार पालिका आयुक्त अजय वैद्य यांच्या आदेशाने आज विशेष पथकाने आज कारवाई केली असून शहरातील बाजारपेठ ऋषभ होलसेल या प्लास्टिक दुकानावर कारवाई करत एकूण 10000 किलो प्लास्टिक जप्त करून एकूण 5,000 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की , ” आमचं पर्यावरण विषयक पथकाने ही कारवाई केली असून प्लास्टिकची जी काही चोरी आहे ,या प्रकारचे प्लास्टिक आहे या प्रकारचा साठा करणारी जी मंडळी आहेत यांच्यावर आमच्या पथक लक्ष ठेवून होतं. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या जे आमची इथले अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर ही संयुक्त कारवाई आज महापालिकेनं पूर्ण केलेली आहे आणि 1000 किलोच्या आसपास प्लास्टिक सापडलेला आहे . आपल्याला बाजारपेठ एरियामध्ये डिस्टर्ब प्लास्टिक एलएलपी म्हणून कंपनी आहे त्या कंपनीकडून हे आम्ही प्लास्टिक जप्त केलेले आहे . अशाच प्रकारची कारवाई पुढे देखील चालू राहील या कंपनीवर पाच हजार रुपये दंडाचा प्राथमिक स्वरूपाचा गुन्हा आम्ही करून एवढी दंडवत देखील मी केलेली आहे आणि यापुढे सुद्धा डिफरंट प्रोव्हिजन आणि वापरणार आहोत .
त्याचप्रमाणे भिवंडी आणि निजामपूर शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील जेवढे भाजी विक्रेते आहेत , जेवढे मार्केट आहेत त्या सर्वांचे संयुक्त बैठक घेणार आहे आणि महिला बचत गटाच्या मार्फत कापडी पिशव्या , कागदी पिशव्या याची आम्ही पूर्णपणे प्रोडक्शन करून त्या पिशव्यांना वापरायला आम्ही भाग पडणार आहोत. त्यांना आवाहन करणार आहोत ; पहिल्यांदा आणि जर नाही ऐकलं तरी आम्ही अशा स्वरूपाची कारवाई देखील पुढे करणार आहोत त्याची व्याप्ती आम्ही वाढवणार आहोत .”
पुढे त्यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले की , आपण कृपा करून कुठलाही सामान खरेदी करताना आपण जेव्हा प्लास्टिक जे घेता व त्या प्लास्टिक मध्ये जे सामान घालतात तो प्लास्टिक हे सरकार मान्य आहे का ? त्याच्यावर रीसायकल बायोडिग्रेडेबल असेल स्वरूपाचा शिक्का प्रमाणित केलेला आहे का? आणि त्याच प्रमाणे 120 पेक्षा मायक्रोनच्या जाडीचं आहे का? हे कृपा करून तपासण . जेणेकरून आपण जे पर्यावरणाला हानी पोहोचत आहोत , वारंवार आपण पाहिला असेल की नालेसफाईच्या कामात सर्वात जास्त अडथळा आम्हाला जो आला होता तो हे जे साचलेला प्लास्टिकचा कचरा होता , त्याचा आला होता . त्याचप्रमाणे त्यामुळे शहरातल्या पाण्याचा निचरा होत नाही . पावसाळ्यामध्ये या प्रकारची जी काही दुर्घटना होतात , ज्यामुळे अडचणी निर्माण होतात , या अडचणी होऊ नये यासाठी आपण सर्व नागरिकांनी दक्षता घेऊन हे काम केलं पाहिजे आणि जर आपल्याला सुद्धा कुठली बातमी मिळाली ; आपल्याला जर कुठे आढळलं की एखाद्या ठिकाणी प्लास्टिकचा साठा अवैधरीत्या ठेवलेला आहे आणि हे प्लास्टिक बँड प्लास्टिक आहे तर कृपा करून आपण महापालिका प्रशासनात कळवा व आमच्याकडून नि:संशयपणे त्यावर कारवाई करण्यात येईल.
ही अतिशय गंभीर बाब आहे . त्यामुळे माझी सर्वांना आवाहन आहे की , आपण जेव्हा घरून खरेदी करायला निघतो तेव्हा आपल्या घरातील कापडी पिशव्या कागदी पिशवी त्याचा वापर करा आपल्याकडचे डबे आहेत त्याचा वापर करा जेणेकरून सर्व विक्रेत्यांना सुद्धा सवय लागेल की आपल्याला जे प्लास्टिक जे द्यायचे आहे पॅकिंगसाठी ते प्लास्टिक हे बायोडिग्रेडेबल पण स्वरूपाचा असेल ,120 पेक्षा जास्त जाडीचं असेल. आपण पाहत असाल ही मोठमोठ्या मॉलमध्ये सुद्धा आपण जेव्हा भाजी खरेदी करतो किंवा वस्तू खरेदी करतो त्यावेळी तुम्हाला पिशवी हवी का म्हणून विचारलं जातं आणि ती पिशवी कागदी स्वरूपाची असते कापडी स्वरूपाची असते आणि त्याला ते चार्ज करतात पण तो जो चार्ज केलेला आहे तो चार ह्या अशा महिला बचत गटाला मिळाला पाहिजे अशी आमची धारण आहे त्यामुळे आम्ही त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात याच्यापुढे व्यापक मोहीम राबवणार आहोत. असे भिवंडी महानगरपालिका आयुक्त अजय वैद्य यांनी सांगितले