politics

उत्तर पश्चिमच्या जागेसंदर्भात कोर्टची लढाई लढणार -आदित्य ठाकरे

Share

उत्तर पश्चिममधे आमचा विजय, हा विजय सरकारी यंत्रणेचा वापर करून हिरवला

मुंबई प्रतिनिधी ,१७ जून :

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांची शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती . उत्तर पश्चिम लोकसभा निकालात झालेल्या घोटाळ्याची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली होती . यावेळी शिवसेना नेते अनिल परब, अनिल देसाई, भास्कर जाधव, सुनील प्रभू आणि उत्तर पश्चिमचे लोकसभा उमेदवार अमोल किर्तीकर उपस्थित होते .


यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की “एकूणच निवडणूक प्रक्रिया आणि ईव्हीएम मशीन ह्यावर देशभरात चर्चा सुरू आहे . मी आधीही म्हटलं होतं, EC म्हणजे ‘एंटायरली कॉम्प्रोमाइज्ड’ कमिशन झाले आहे . संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक झाली असती तर भाजपच्या २४० काय ४० जागाही आल्या नसत्या . अमोल कीर्तिकर ह्यांची सीट आम्ही जिंकलेली आहे . ह्या प्रकरणी निवडणूक आयोगाने योग्य ती कारवाई करणे अपेक्षित आहे . अन्यथा कायद्याच्या सहाय्याने पाठपुरावा करून आम्ही हा विजय मिळवणारच ! असा निर्धार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला .

४ जूनला निकाल लागला यामध्ये अमोल कीर्तिकर यांचा ४८ मतांनी पराभव झाला . मात्र निकाल संशयास्पद लावण्यात आलाय . निवडणूक प्रक्रिया पूर्ण पणे डावलण्यात आली ती १९ व्या फेरीनंतर . प्रत्येक फेरी नंतर कोणत्या उमेदवाराला किती मत मिळाली याची आकडेवारी प्रत्त्येक फेरी नंतर दिली जाते . १९ व्या फेरीपर्यत हे सगळं व्यवस्थित सुरु होतं . आणि पक्षाचे प्रतिनिधी आकडेवारीची tally करत असतात. RO नंतर आकडेवारी फायनल करतात . पण इथे RO आणि उमेदवारचा प्रतिनिधि यामध्ये अधिक अंतर ठेवण्यात आलं होतं, दूर बसवण्यात आलं होतं . मत मोजून झाल्यानंतर फॉर्म १७ c भरून द्यायचा असतो . ज्यामध्ये आपल्याला उमेदवाराला किती मत मिळाली हे द्यावं लागतं . पण फॉर्म अनेकांना दिले नाहीत , आमच्या tally मध्ये ६५० पेक्षा अधिक मिळाले आहेत .. ६५० मतांचा फरक आमच्या आणि त्यांच्या tally मध्ये येतोय . निकाल जाहीर करण्याआधी निवडणूक अधिकारी सांगतात की आम्ही निकाल जाहीर करतोय . मात्र यामध्ये काहीच सांगण्यात आला नाही . आम्ही सीसीटीव्ही फुटेज मागितलं तर दोन दिवसात देऊ असा सांगितलं . नंतर हे फुटेज देण्यास नकार दिला . कोर्टाच्या आदेशानुसार देऊ शकत नाही, अस ते सांगतात .

निवडणूक केंद्रात मोबाइल वापरला गेला . त्यावर कोणाचे फोन आले याची सगळी माहिती आमच्याकडे आहे . १० दिवसानंतर गुन्हा दाखल झाला, या १० दिवसात मोबाइल बदलले गेले असा आमचा आरोप आहे . गुरव कोण आहे? या अधिकाऱ्याचा मोबाइल वापरला का ? सगळ्यांची माहिती आम्हाला मिळाली पाहिजे . हा विजय आमचा आहे, हा विजय सरकारी यंत्रनेचा वापर करून हिरवला गेलाय . RO चा इतिहास तपासा, किती भ्रष्टाचारच्या केसेस मध्ये त्या आहेत ? इलेक्शन कमिशन ने तक्रार घेतली पाहिजे . यावर चौकशी व्हावी . दोन दिवसात याचिका आम्ही कोर्टात दाखल करू .आम्ही निकाल जाहीर केला तेंव्हा तक्रार दाखल केली . आम्ही पीपल रिप्रेजेंस्टेशन ऍक्ट अंतर्गत सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करणे यावर आम्ही कोर्टात जाणार आहोत . असे पत्रकार परिषदेत अनिल परब यांनी तांत्रिक मुद्दे सांगितले

Related posts

पहिल्याच पावसाने सरकारचे पितळ उघडे पाडले ! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका

editor

संजय राऊत यांनी रोखठोकमधून आकलेचे तारे तोडले – बावनकुळे

editor

डोंबिवलीतील उबाठा गटाचे उपनेते सदानंद थरवळ यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

editor

Leave a Comment