Civics

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर आदिवासी टायगर सेनेचे आंदोलन

Share

चंद्रपूर,३० मे :

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय चंद्रपूर अंतर्गत सावली येथील मुलीच्या वसतिगृहात कार्यरत गृहपाल गीता झुरमुरे यांनी बोगस अपंगत्व प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवून शासनाची दिशाभूल केली आहे. गृहपाल गीता झुरमुरे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे या मागणीला घेऊन आज ३० मे ला गुरुवारी आदिवासी टायगर सेना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद चंद्रपूर यांच्या वतीने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे.

सात दिवसांच्या आत गृहपाल गीता झुरमुरे यांना सेवेतून बडतर्फ करा अन्यथा आमरण उपोषण करणार असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. आंदोलनकर्त्यांच्या मागणीवर प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी माहिती दिली की आम्ही याबाबत चौकशी सुरू केली आहे, त्या अनुषंगाने झुरमुरे यांची नागपूर इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथे तपासणी करण्यात आली असून त्याबाबत अहवाल येणे बाकी आहे, महाविद्यालयाचा अहवाल व प्रमाणपत्र आम्हाला मिळाले की आम्ही पुढील कारवाई करू असे यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे.

Related posts

कोयना प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे मुख्यमंत्र्यांचे कोकण आयुक्तांना आदेश

editor

पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे यांची नियुक्ती

editor

जिओ पॉलिमर तंत्रज्ञानाचा वापर करून गुंदवली मेट्रो स्‍थानकाच्‍या काँक्रिट रस्‍त्‍याची दुरूस्‍ती

editor

Leave a Comment