crime

कौटुंबिक हिंसाचार आणि पोलिसांकडून दबाव तंत्र टाकलेल्या महिलेल्या अखेर दोन वर्षानंतर मिळाला न्याय

Share

नाशिक, ४ जुलाई :

डॉक्टर प्राजक्ता नागरगोजे या महिलेस तिचा पती योगेश नागरगोजे आणि सासरच्यांकडून छळवणुकीचा त्रास सुरू होता. पोलिसात कौटुंबिक हिंसाचार व कौटुंबिक वादाबाबत तक्रार देण्यात आली.

३० मार्च २०२२ रोजी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात या महिलेला समुपदेशनासाठी महिला सुरक्षा समिती नाशिक यांच्या कार्यालयात पोलिसांकडूनच त्रास देण्यात आला. पती योगेश नागरगोजे यांच्याकडून मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली होती. मात्र महिला सुरक्षा समितीतील महिला पोलिसांनी या महिलेस तू तुझ्या नवऱ्यासोबत नांदायला जा असा दबाव टाकला. पीडित महिलेची बाजू ऐकून न घेता पीडित महिलेच्या पतीसोबत संगणमत करून पीडित महिलेवरच दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. यात आठ महिला पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी महिला देखील सामील होत्या.

नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रारदार महिलेस महिला पोलीस अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली. पीडित महिलेस बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली आणि मारहाण करता वेळी पीडित महिलेच्या आईला देखील पोलीस ठाण्यात बळजबरीने डांबून ठेवले. त्यानंतर पीडित महिलेविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करून सहा दिवस न्यायालयीन कोठडीत देखील पाठवण्यात आले.

पीडित महिलेसोबत एक वर्षाचे बाळ आणि तिच्या आईला न्यायालयीन कोठडी देण्यात आली मात्र त्यानंतर पोलिसात न्याय मिळत नसल्याने पीडित तक्रारदार महिलेने नाशिकच्या प्रशासकीय पोलीस तक्रार प्राधिकरणात धाव घेतली. आणि अखेर दोन वर्षानंतर पीडित महिलेला न्याय मिळाला

नाशिक विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण यांनी आठ पोलीस अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांविरुद्ध २३एप्रिल २०२४ रोजी पदाचा गैरवापर करून गैरवर्तवणूक केल्या संदर्भात महाराष्ट्र विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण व कार्यपद्धती विनियम २०१८ नियम ११ (१ )व तसेच ११ (९ ) प्रमाणे कारवाई करत दोषी ठरवण्यात आले. या संदर्भात संपूर्ण घटनाक्रमाची माहिती पीडित महिलेने दिली तर, खटला चालवणारे एडवोकेट उमेश वालझाडे यांनी देखील पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल करून पीडित महिलेस कशाप्रकारे अडकवण्यात आले त्याची सविस्तर माहिती दिली.

Related posts

Delhi Court Rejects Bail for Umar Khalid in 2020 Delhi Riots Case

editor

“Arvind Kejriwal Challenges Arrest in Delhi High Court Over Excise Policy Case”

editor

RBI Employee Falls Victim to Scammers, Loses Rs 24.5 Lakh

editor

Leave a Comment