Civics

बाणगंगा तलावाच्या परिसरात नुकसान करणाऱया कंत्राटदाराविरोधात

Share

कडक कारवाई करण्याच्या बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या सूचना

बाणगंगा परिसरातील कामे पुरातत्त्व विभागाच्या सूचनेनुसार करण्यात येणार

मुंबई , २७ जून :

ऐतिहासिक बाणगंगा तलाव व परिसरात सुरू असलेल्या पुनरूज्जीवन कामांची पाहणी करण्यासाठी दौरा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी आज (दिनांक २७ जून २०२४) केला. बाणगंगा तलाव परिसरात संयंत्र उतरवून पायऱयांना हानी पोहचवतानाच पुरातत्त्व विभागाच्या नियमांचा भंग करणाऱया कंत्राटदाराविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना गगराणी यांनी दिल्या. त्यासोबतच पुरातत्त्व विभागाच्या सूचनेनुसार उर्वरित टप्प्यातील कामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच तलावातील गाळ काढण्याचे काम हस्तचलित यंत्रणेद्वारे (मॅन्युअल पद्धतीने) करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी डी विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. ऐतिहासिक अशा बाणगंगा तलाव व परिसर पुनरुज्जीवन प्रकल्प अंतर्गत कामे करताना तलावाच्या उत्तर प्रवेशद्वारावरून आतमध्ये एक्सकॅव्हेटर संयंत्र (Excavator) उतरवून तलावांच्या पायऱयांची हानी केल्याबद्दल संबंधित कंत्राटदारास महानगरपालिकेच्या वतीने यापूर्वीच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच तलावास हानी पोहोचवून नुकसान केल्याबद्दल मलबार हिल पोलीस ठाण्यात प्रथम माहिती अहवाल (FIR) दिनांक २५ जून २०२४ रोजी दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हानी पोहोचलेल्या पायऱया दुरुस्त करण्याची कामे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने त्याचदिवशी त्वरित पूर्ववत करून पायऱया करण्यात आल्या आहेत. तसेच यापुढच्या काळात उर्वरित कामेही पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली.


बाणगंगा परिसर आणि याठिकाणची मंदिरे यांच्याशी संबंधित कामांमध्ये योग्य आदर ठेवला जाणे अपेक्षित आहे. पुरातत्त्व विभागाशी समन्वय साधत येत्या दिवसात बाणगंगा परिसरातील उर्वरित कामे ही नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी आज दिल्या. उर्वरित गाळ काढण्याची कामे यापुढच्या काळात हस्तचलित यंत्रणेच्या पद्धतीने करण्यात येतील, असेही आयुक्त भूषण गगराणी नमूद केले.


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या डी विभागाच्या माध्यमातून बाणगंगा परिसरात पर्यटन स्थळ विकासासाठी अनेक कामे हाती घेण्यात आली आहेच. तलाव परिसरातील बांधकामे डी विभागामार्फत निष्कासित करण्यात आली आहेत. तसेच दीपस्तंभ आणि पुरातन वारसा जतन (हेरिटेज) ची कामे पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार शशी प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहेत. तलावाच्या पायऱयांची हानी केल्याबद्दल बाणगंगा प्रकल्पाचे कंत्राटदार मे. सवानी हेरिटेज कन्झर्वेशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत.

Related posts

शासनाचा ढीला कारभार ,मुख्यमंत्र्यांना तब्बल १७ दिवसांनी जाग

editor

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची एस आर ए कार्यालयावर धडक !

editor

RBI Employee Falls Victim to Scammers, Loses Rs 24.5 Lakh

editor

Leave a Comment