politics

अजितदादांच्या राष्ट्रवादीची परफॉर्मन्स मध्ये वजाबाकी, पण नेत्यांची नाराजी आणि भाजपला दमदाटी

Share

मुंबई प्रतिनिधी ,दि .२० जून :

अजितदादांच्या राष्ट्रवादीची परफॉर्मन्स मध्ये वजाबाकी, पण नेत्यांची नाराजी आणि भाजपला दमदाटी, अशी खरंच त्या राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था आहे!! अजितदादांच्या राष्ट्रवादीचा परफॉर्मन्स लोकसभा निवडणुकीत ढिल्ला ठरला.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून मात्र नाराजीचे सूर उमटले. किंबहुना भाजपने आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जेव्हा पराभवाची चिकित्सा केली, त्यावेळी आकडेवारी सह अजितदादांच्या परफॉर्मन्सचा पर्दाफाश झाला. मावळ, माढा, सोलापूर, शिरूर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये अजित पवारांचे समर्थक आमदार असूनही त्यांच्याच विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवारांना पीछेहाट सहन करावी लागली. हे आकडेवारीने सिद्ध झाले आहे. त्यावर भाजपच्या काही नेत्यांनी पक्षांतर बैठकीमध्ये नाराजी व्यक्त केली त्यांनी प्रसार माध्यमांकडे जाऊन नाराजी व्यक्त केली नाही संघाच्या “ऑर्गनायझर” नियतकालिकातून भाजपला कानपिचक्या देण्यात आल्या.पण भाजप आणि संघाने केलेली ही चिकित्सा अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागली. राष्ट्रवादीच्या ढिल्ल्या परफॉर्मन्सचे हे सत्य त्यांना पचले नाही. त्यामुळे हसन मुश्रीफ, रूपाली पाटील, अमोल मिटकरी हे अजितदादांचे समर्थक बाहेर येऊन भाजपवरच आरोप लावू लागले.

अजित पवार यांना बारामतीतून सुनेत्रा पवारांना निवडून आणता आले नाही. तरीपण अजितदादांनी त्यांना परस्पर राज्यसभेवर घेतले. शिवसेना – भाजपने त्यांना मूकसंमती दिली. असे असतानाही भाजप आणि संघाने महायुतीच्या पराभवाच्या केलेल्या चिकित्सेला अजितदादांच्या राष्ट्रवादीचा विरोध आहे. त्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांची चिडचिड झाली आहे. त्यातच राष्ट्रवादीचे बडे नेते छगन भुजबळ यांनी देखील समता परिषदेच्या माध्यमातून स्वपक्षाला तसेच महायुतीला इशारे देण्याचा प्रयत्न देखील केला. वेगळा विचार करण्याची भाषा देखील कार्यकर्त्यांच्या तोंडून बोलवण्यात आली.

अजितदादांच्या राष्ट्रवादीला महायुतीत मोठा लाभ मिळाला. त्यांचे जवळपास ९ मंत्री झाले. सुनेत्रा पवारांचा पराभव होऊन देखील त्या राज्यसभेत खासदार झाल्या, पण महाराष्ट्रातल्या महायुतीच्या पराभवाची चिकित्सा राष्ट्रवादीच्या नेत्यांना सहन झाली नाही. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते भाजप वरच जाहीरपणे उलटले. भाजपलाच वेगळा विचार करण्याची दमदाटी करू लागले. आता भाजप अजितदादांच्या बाबतीत नेमका काय निर्णय घेणार ?, त्यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना कोणत्या भाषेत “समजावून” सांगणार ?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related posts

मुंबईतील जमिनीचे अधिकार अदानीला देण्याचे केंद्राचे निर्देश – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आरोप

editor

अदित्य ठाकरेंचा जोगेश्वरीत दणदणीत रोड शो

editor

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि‍ शेवटच्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया संपली असून अंदाजे सरासरी  ५४.३३ टक्के मतदान झाले

editor

Leave a Comment