Uncategorized

अजित पवारांचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचा तिसऱ्या आघाडीत प्रवेश

Share

गोंदिया , दि.25 ऑक्टोबर :

निवडणुकीच्या अगदी तोंडावर बच्चू कडू यांनी ‘परिवर्तन महाशक्ती’ नावाने तिसरी आघाडी तयार केली होती. गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी विधानसभेचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे व त्यांचे पुत्र सुगत चंद्रिकापुरे यांनी प्रहार पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे मोरगाव जुनी विधानसभेत तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विशेष म्हणजे मोरगाव अर्जुनी विधानसभेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना तिकीट मिळणे अपेक्षित होते. मात्र, ऐनवेळी भाजपमधून राष्ट्रवादी अजित पवार गटात आलेले माजी मंत्री राजकुमार बडोले यांना अजित पवारांनी पक्षप्रवेश देत उमेदवारी ही जाहीर केली होती. त्यामुळे नाराज असलेले मनोहर चंद्रिकापुरे व त्यांचे पुत्र सूगत चंद्रिकापुरे यांनी सुरुवातीला शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर काँग्रेस नेते विजय  वडेट्टीवार यांच्याशी देखील त्यांनी संपर्क केला.मात्र तिथेही त्यांची डाळ गळली नाही त्याच्यामुळे त्यांनी आता अखेर बच्चू कडू यांच्या तिसऱ्या आघाडीमध्ये (प्रहार) प्रवेश केला आहे.. यामुळे मोरगाव अर्जुनी विधानसभेत तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे…

” त्या पक्षामध्ये मी निष्ठावंत म्हणून काम केल आहे . 2014 ची निवडणूक आल्यानंतर सुद्धा मी मतदार संघातून माघार घेतली नाही ; मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर माझी तिकीट कापली गेली आहे परंतु आता या निवडणुकीत मी माझ्या सामान्य कार्यकर्त्यांसोबत ही निवडणूक लढणार असून राष्ट्रवादी पक्षाला आम्ही नक्कीच धडा शिकवणार ” असे यावेळी आमदार मनोहर चंदिकापुरे म्हणाले.तर माझ्यासोबत पक्षाने अन्याय केला त्याच्यामुळे मी तो भावनिक पत्र माझ्या मतदारसंघातील जनतेला लिहिला असे त्या वायरल भावनिक पत्रावर चंद्रिकापुरे म्हणाले.

Related posts

आमदार कैलास गोरंट्याल यांच्या प्रचारार्थ सचिन पायलट यांची भव्य प्रचार सभा संपन्न

editor

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात: 3 ठार, 8 जखमी , बोरघाट परिसरात पहाटे सव्वाचार वाजताची घटना 

editor

कॉपर केबलचे आमिष दाखवून मुंबईच्या पार्टीला घातला गंडा; लुटीतील तिघे १२ तासांतच पोलिसांच्या ताब्यात

editor

Leave a Comment