Civics

मनमाड रेल्वे स्टेशन सोबत रेल्वे कर्मचारी सापडले पाणी टंचाईच्या विळख्यात

Share

मुंबई,३० मे :

धरणातील पाणी साठा संपुष्टात आल्यामुळे मनमाड रेल्वे स्टेशन सोबत रेल्वे वर्क शॉप आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वसाहती पाणी टंचाईच्या विळख्यात सापडले असून त्यांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

मनमाडचे रेल्वे स्टेशन भुसावळ विभागात महत्वपूर्ण जंक्शन मानले जाते येथून रोज सुमारे १२५ गाड्यां धावतात त्यामुळे सर्वच प्लॉट फार्मवर प्रवाशांची मोठी गर्दी असते शिवाय येथे रेल्वे कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असल्यामुळे त्यांच्या ५ मोठ्या कॉलनी आहेत.येथे ब्रिटिश कालीन रेल्वेचे वर्क शॉप असून त्या भागात अनेक गाड्यांची साफसफाई करून त्यात पाणी भरले जाते या सर्वासाठी रोज सुमारे ३ लाख लिटर पेक्षा जास्त पाणी लागते. मात्र पावसा अभावी धरणाने तळ गाठला असून पाटोदा येथे असलेल्या साठवणूक तलावात देखील जेमतेम पाणी उरले आहे त्यामुळे प्रवाशांसोबत कर्मचारी आणि वर्क शॉप मध्ये पाणी पुरवठा कसा आणि कोठून करावा असा प्रश्न रेल्वे प्रशासनाला पडला आहे.

Related posts

ग्रंथालयांना अनुदान देण्याबाबत शासनाची नेमकी भूमिका काय ? भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचा सवाल

editor

राज्य सरकारच्या शासकीय कंत्राटी भरती विरोधात युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आंदोलन

editor

Delhi High Court Grants Bail to Sharjeel Imam in Riots Case

editor

Leave a Comment