crime Mahrashtra

तसेच विशाळगडावरीलसर्व अतिक्रमणे हटवणार ! मुख्यमंत्र्यांचे आश्वासन.

Share

पंढरपूर,दि. १८ प्रतिनिधी :

विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विरोधात आंदोलन करणार्‍या शिवप्रेमींवर प्रशासनाकडून कारवाई करत खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. हे गुन्हे तात्काळ मागे घेण्याची मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात भेट घेऊन केली. या वेळी शिवसेनेचे मुख्य प्रतोद आणि आमदार भरत गोगावले उपस्थित होते.

यावर मुख्यमंत्र्यांनी ‘कोणावरही आम्ही अन्याय होऊ देणार नाही, तसेच विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे हटवण्यात येतील. केवळ विशाळगडच नव्हे, तर राज्यभरातील ज्या ज्या गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणे झाली आहेत, सर्व हटवण्यात येतील, तसेच सर्व गड-दुर्गांचे शासनाकडून संवर्धन अन् विकास करून त्यांचे पावित्र्य राखले जाईल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विशाळगडावर शेकडो अतिक्रमणे झाली आहेत. ती काढण्यासाठी प्रशासनाने कारवाई केली नाही. त्यामुळे शिवप्रेमींचा उद्रेक झाला; मात्र आंदोलन करणार्‍या गड-दुर्ग प्रेमींवर दरोड्यासारखी कलमे लावणे, तसेच अनेक निरपराध हिंदूंना अटक करणे, अत्यंत चुकीचे असून या प्रकरणी सर्व हिंदूंवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत. तसेच सध्या अतिक्रमण हटवण्याची चालू झालेली मोहिम विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे हटवूनच पूर्ण करावी, तसेच राज्यातील ज्या ज्या गडांवर अतिक्रमणे झाली आहेत, ती सर्व अतिक्रमणे शासनाने तात्काळ हटवावीत, अशी मागनी ही हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्या.

Related posts

नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

editor

पुलवामा व इतर देशद्रोही कृत्यात हात असल्याचे सांगून वृद्ध पती-पत्नीची 32 लाखांची फसवणूक; आरोपी फरार

editor

यवतमाळ शहर वाहतूक पोलीसांची वाहन चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांसह कर्णकर्कश हॉर्नच्या वाहनांवर कारवाई सुरु

editor

Leave a Comment