Culture & Society national

दिल्ली येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दिसणार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाचा AI चित्र प्रवास.

Share

बार्शीच्या संजय कांबळे ना विशेष निमंत्रण !

मुंबई, दि.19 फेब्रुवारी :

बार्शी –येथील संजय श्रीधर कांबळे यांना दिल्ली येथील 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी विशेष निमंत्रण दिले गेले आहे.दिनांक 21 ,22, 23 फेब्रुवारी या काळामध्ये दिल्लीत तालकटोरा स्टेडियममध्ये हे संमेलन संपन्न होत आहे. या संमेलनात तालकटोरा स्टेडियम मध्ये अण्णाभाऊ साठे व्यासपीठ उभारण्यात आले आहे. तसेच या साहित्य नगरीला छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी असे नामकरण करण्यात आले आहे.


या संमेलनामध्ये संजय श्रीधर कांबळे यांनी निर्माण केलेल्या AI तंत्रज्ञानाने निर्मित साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाचा चित्र प्रवास घडवणारी छायाचित्रे प्रदर्शनात मांडली जाणार आहेत .


गतवर्षी पुणे येथे सारसबाग परिसरामध्ये झालेल्या या चित्र प्रदर्शनाला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री महोदयांनी उपस्थिती लावून चित्रप्रदर्शनाचा आनंद घेतला होता .तसेच पुणे शहर व परिसरातील लाखो अण्णाभाऊ साठे प्रेमींनी या प्रदर्शनाचा आनंद घेतला होता. यावर्षी महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त चित्र प्रदर्शनातील अनेक फोटो महाराष्ट्रभर प्रदर्शित झाल्याचे पाहायला मिळत होते .


हे प्रदर्शन दिल्लीमध्ये व्हावे यासाठी सरहद संस्थेचे प्रमुख संजय नहार यांनी संजय श्रीधर कांबळे यांना विशेष निमंत्रण दिले आहे . त्यामुळे हे प्रदर्शन दिल्ली येथे संपन्न होणार आहे.अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील बालपणापासून ते अण्णाभाऊ साठेंचा रशिया प्रवासापर्यंत ची काही ठळक वैशिष्ट्ये असणारी छायाचित्रे यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत.हे एक विशेष प्रदर्शन म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे.या चित्रांचा समावेश असणारे एक पुस्तकही नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे .या पुस्तकाच्या भेटीचा कार्यक्रम दिल्लीमध्ये मान्यवरांच्या हस्ते केला जाणार आहे.
दिल्ली येथे होत असलेल्या संमेलनातील उल्लेखनीय सहभागाबद्दल संजय श्रीधर कांबळे यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

Related posts

राघवेंद्र स्वामी यांच्या ‘श्रीकृष्ण चारित्र्य मंजिरी’ च्या मराठी टीकेचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

editor

जम्मू काश्मीर मध्ये रस्ते अपघातात पाच जणांचा मृत्यू

editor

भारताला जोडणारी ” राष्ट्रीय एकात्मता यात्रा “

editor

Leave a Comment