crime Mahrashtra

शिरपूर तालुक्यातील सावळदे गावातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न करत एटीएम मशीन जाळण्याची घटना

Share

मुंबई , ४ जुलाई :

स्टेट बँक ऑफ इंडिया बॅंकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत एटीएम मशीन जाळण्याची घटना आज दि ४ रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे. आगीत एटीएम मशीन रुममधील दोन एस्सींसह मशीन जळाले आहे. यात किती चोरी झाली याबाबत अद्याप माहिती मिळु शकलेली नाही.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील सावळदे गावातील शिंदखेडा रस्त्यावर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे.विशेष म्हणजे एटीएम मशीन जाळण्याचा प्रयत्न झाला आहे.

एटीएम मशीन कट्टरच्या साह्याने तोडल्याचे दिसुन आले आहे.संशयितांनी संपूर्ण मशीन रुमला आग लागल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.आगीचे लोट एटीएम मशीन रूमच्या बाहेर येत असल्याने ग्रामस्थांना समजल्याने घटनेचा उलगडा झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे,शिरपूर शहर पोलिस स्टेशनचे उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत सोनवणे,पोलिस निरीक्षक के के पाटील यांच्यासह शोध पथक घटनास्थळी दाखल झाले.या घटनेत नेमकी किती रोकड चोरी झाली याबाबत अद्याप माहिती मिळु शकलेली नाही‌.दोन दिवसांत एटीएम मशीन फोडण्याची ही दुसरी घटना घडली आहे.

Related posts

Maharashtra Probes Porsche Crash Blood Tampering

editor

आग की भयंकर लपट: डोंबिवली फैक्ट्री विस्फोट के अंदर की कहानी

editor

Devendra Fadnavis Vows Action Against Teen in Fatal Pune Crash

editor

Leave a Comment