Mahrashtra Uncategorized

.. आणि उद्धव ठाकरे आणि फडणवीस एकाच लिफ्टमध्ये

Share

मुंबई प्रतिनिधी , २७ जून :

राज्य विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू झाले. या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष म्हणून शिवसेना उबाठा गटाच्या सर्व आमदारांनी पूर्ण वेळ विधान भवन परिसरात हजर राहण्याचे उद्धव ठाकरे यांनी आदेश दिले होते. त्यातच आज दुपारी बाराच्या सुमारास उद्धव ठाकरे यांचे विधान भवनाच्या परिसरात आगमन झाले. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात असताना मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी अनिल परब यांना पेढा भरवला तसेच उद्धव ठाकरे यांची भेट देखील घेतली.

बारा वाजताच्या दरम्यान विधान परिषदेचे कामकाज सुरू होणार होते त्यावेळी तळमजल्यावरून चौथ्या मजल्यावर जाण्याकरिता उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकाच वेळी लिफ्ट जवळ एकत्र आले आणि त्यांच्यामध्ये सामान्य चर्चा देखील झाल्या. विधान परिषदेच्या कामकाजात सहभाग घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकाच लिफ्ट मध्ये गेल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीचे हे शेवटचे अधिवेशन असल्याने संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांचे विरोधी पक्ष नेत्यांच्या कार्यालयात उद्धव ठाकरे यांची भेट घेणे तसेच लिफ्ट मध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची विधानमंडळात लिफ्ट जवळ भेट घेणे यामुळे विधान भवन परिसरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

दिल मिले ना मिले पर हाथ मिलाते चले असेच काहीसे वातावरण लिफ्ट जवळ पहावयास मिळाले. लोकसभा निवडणुकीत एकमेकांवर जोरदार हल्ले झाल्यानंतर आता विधानसभेसाठी तयारी सुरू झालेली असताना अशा प्रकारच्या भेटीमुळे राजकीय वातावरण काहीसे निवळलेले पाहावयास मिळाले.

Related posts

वडीगोद्री येथे सुरू असलेल्या ओबीसी आरक्षण बचाव आमरण उपोषणाला सरकारच्या शिष्टमंडळाची भेट

editor

धरणातील पाण्याचा पूर्ण क्षमतेने सिंचनासाठी वापर करावा – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

editor

मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन ठप्प!

editor

Leave a Comment