Civics Mahrashtra

लाडकी बहिण व लाडका भाऊ घोषणा करा ! मात्र पूर्वीच्या घोषणा पूर्ण करा आझाद मैदानातील आंदोलनकर्त्यांचा सवाल

Share

मुंबई / रमेश औताडे , ३ जुलाई :

लाडकी बहिण व लाडका भाऊ घोषणा करा पण यापूर्वी अधिवेशनात केलेल्या घोषणा व आश्वासनांचे काय ? असा सवाल आझाद मैदानात आंदोलन करत असलेले अन्यायग्रस्त सरकारला करत आहेत. भर पावसात घर दार सोडून इथे आंदोलन करायला आम्हाला काय वेड लागले आहे का ? नुसत्या घोषणा करून मोकळे होऊ नका, त्याची अंमलबजावणी करा. नाहीतर आगामी निवडणुकीत अन्यायग्रस्त जनतेची ताकद काय असते ते दिसेल. असा संतप्त सवाल आंदोलनकर्ते करत आहेत.

समाजातील असा एकही घटक नाही जो या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील आझाद मैदानातील आंदोलनात सहभागी झाला नाही. शेतकरी, ग्रामसेवक, कोतवाल, पोलीस पाटील, तलाठी, रोजगार हमी मजूर, आरोग्य विभागाशी निगडित परिचारिका, आशा सेविका, नर्सेस, वेठबिगार शिक्षक, आश्रम शाळा चालक, अंगणवाडी सेविका व मदतनीस हे शिक्षण विभागातील अन्यायग्रस्त तर झोपडपट्टी तोडली म्हणून भर पावसात बेघर झालेले, सावकारी कर्ज घेऊन आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे कुटुंब, असे अनेक अन्यायग्रस्त आंदोलन करत सरकारकडे न्याय मागत आहेत.

दोन दिवसांपूर्वी मंत्रालयात उषा मेहता या महिलेने न्याय मिळत नाही म्हणून हातावर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. काही वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिके समोर एका महिलेने न्यायासाठी पेटवून घेतले होते. मंत्रालयात सहाव्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सुरक्षित जाळी लावली गेली.जगात अशी जाळी कुठेच नाही. तरीही न्याय मिळत नाही असे आझाद मैदानात आंदोलन करणारे शेतकरी राजेंद्र कदम आपल्या संतप्त भावना भर पावसात सांगत असताना त्यांच्या डोळ्यात पाणी आले. अजून किती वर्ष आम्ही न्याय मागायचा ? अधिवेशन आले की सरकार विधान भवनात ए सी मधे बसून घोषणा करते मात्र त्याची अंमलबजावणी करत नाही.

सरकारी भूसंपादन जमीन गेल्याने करोडो रुपयांची नुकसान भरपाई मिळावी म्हणून आंदोलन करणारे दत्तात्रय पेटकर यांना सर्वोच्य न्यायालयाने न्याय दिला आहे मात्र महाराष्ट्र शासनातील सरकारी बाबू सर्वोच्य न्यायालयाचे आदेश अंमलबजावणी करण्यास विलंब करत आहेत.

महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळ योजनेत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्या प्रकरणी आंदोलन करणारे मधुकर रगडे यांनी जीवावर उदर होत माहिती अधिकारात मिळवलेली माहिती कागदपत्र व पुरावे पाहण्यास सरकारला वेळ नाही.म्हणून त्यांनी आंदोलन सुरू केले आहे.

बोगस शिक्षकावर तत्काळ कारवाई करावी म्हणून भंडारा येथून मैदानात आलेले हरी लंजे यांच्याकडे शिक्षण विभाग दुर्लक्ष करत आहे. तर निराधार मानधन व घरकुल मिळावे म्हणून सरकारी लाडकी बहीण सुनंदा मोकाशी अनेक वर्षापासून न्याय मागत आहेत.

अतिक्रण करून बांधकाम केल्याप्रकरणी विक्रम कांबळे यांनी उपोषण सुरू केले आहे. राज्य परिवहन विभाग कर्मचारी, दरड कोसळून नुकसान झालेले रहिवाशी, किमान वेतनासाठी शिक्षक आंदोलन करत आहेत., नदीपात्रात दुर्गंधीयुक्त केमिकल सोडणाऱ्या कारखाण्याविरोधत, देवस्थान जमीन घोटाळा बाहेर काढून अद्याप कारवाई होत नसल्यामुळे न्याय मागणारे , व्यसनमुक्त महाराष्ट्र व अमली पदार्थांचा वापर थांबवा यासाठी नरेंद्र राणे यांनी आंदोलन सुरू केले आहे.

राज्यातील किल्ले, प्राचीन मंदिरे यांची दुरवस्था हा महत्वाचा विषय घेऊन पंकज सप्तिस्कर यांनी उपोषण सुरू केले आहे. बेस्ट उपक्रमाच्या ३३३७ बसेस व कंत्राटी चालक वाहक कायमस्वरूपी करावे यासाठी मंगेश म्हाबदी यांनी मैदानात आंदोलन सुरू केले आहे तर रोजगार हमी विहीर प्रकरणी गणेश मडपे यांनी ग्रामविकास मंत्री यांची वेळ मागितली आहे. महिला बचत गटाला आहार वाटप कंत्राट मिळावे म्हणून आरमायटी इराणी यांनी आंदोलन सुरू केले आहे.

Related posts

मनातून अजून कोरोना न गेलेल्या त्या मतदारांना विश्वास देण्याचे काम करत आहे : खासदार राहुल शेवाळे

editor

ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी राबवले अभियान

editor

उल्हासनगर मनपातर्फे वालधुनी नदी स्वच्छता अभियान

editor

Leave a Comment