Education

उल्हासनगर महापालिकेच्या शाळांची दुरावस्था

Share

उल्हासनगर ,१७ जून :

उल्हासनगर महापालिकेच्या २८ शाळा आहेत. त्या ही शाळा महापालिकेला नीट सांभाळता येत नाहीत. त्यामुळे या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. तर यातील काही शाळा ठेकेदाराच्या घशात घालण्याचा प्रयत्न होत आहे. सदर महापालिकेच्या शिक्षण विभागा मार्फत सुरु असुन हा विभाग भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे.

उल्हासनगर महापालिका शिक्षण विभाग हा आयुक्तांच्या अखत्यारित आहे किंवा नाही हेच समजुन येत नाही. या विभागाचा चिक्की घोटाळा हा प्रसिध्द असुन इतर साहित्य खरेदी मध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचे दिसुन येत आहे. महापालिकेच्या शाळा व्यवस्थित राहिल्या तर गोर गरीबांची मुले शिकुन मोठे तरी होतील . दरम्यान शिक्षण विभागा अंतर्गत असलेल्या हिंदी माध्यमसिंधी माध्यमाच्या शाळाचे नामोनिशाणच राहिले नाही. तर खाजगी ठेकेदार आता महापालिकेच्या शाळांवर नजर ठेवुन आहेत. महापालिकेच्या शाळा मधील मुलाना वेळेवर कोणतेच शालेय साहित्य मिळत नाही. तर या महापालिकेत शिक्षणाच्या नावाने मोठा गोरख धंदा सुरु असल्याचे समजते . या शिक्षण विभागात प्रशासन अधिकारी कोणी ही असला तरी तो फक्त सयाजीराव म्हणुनच कार्यरत असतो. यावर अंकुश मात्र दुसऱ्यांचाच असल्याने या विभागात भ्रष्टाचाराचा बोलबाला वाढला आहे.

Related posts

आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलाच्या २१ शाखांचा दहावीचा निकाल १०० टक्के

editor

Ruskin Bond’s 90th Birthday Interview Sparks Debate on Tourist Site Policies

editor

बुलढाण्याचा १८ महिन्यांचा अंशिक ठरला आयबीआर अचीव्हर; अंशिकच्या नावाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद

editor

Leave a Comment