Civics Mahrashtra

बैलांच्या कानाला टॅग मारण्याची मुदत वाढवण्याची बळीराजा प्राणी व बैलगाडी शर्यत बचाव समितीची मागणी

Share

सातारा :
बैलगाडी शर्यती संबंधित राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने नवीन नियमावली लागू केलेली आहे. त्यामुळे आता सरसकट सर्वच बैलांच्या कानाला टॅग लावण्यात येणार आहे. परंतु बैलगाडी शर्यतीत सक्रिय सहभाग घेणाऱ्या बैलांना कानाला टॅग लावण्याची मुदत वाढवून द्यावी व काना ऐवजी गळ्याला टॅग लावावा अशी मागणी बळीराजा प्राणी व बैलगाडी शर्यत बचाव समितीचे बैलगाडी प्रेमी व हनुमंतराव चवरे -पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे

.
याबाबत माहिती अशी की, राज्य शासनाने महाराष्ट्रातील सरसकट प्राणी यांची जनगणना करण्यासाठी त्यांच्या कानाला टॅग लावण्याची भूमिका एक जून पासून सुरू करणार आहे.त्यामुळे आता शर्यतीतील बैलांना सुद्धा कानाला टॅग लावण्यात येणार आहे .या प्रकारामुळे शेतकरी व बैलगाडी शर्यत प्रेमींमध्ये संभ्रमावस्था झालेली होती .

याबाबत आज सातारा निवासी उपजिल्हाधिकारी श्री नागेश पाटील यांची बळीराजा प्राणी व बैलगाडी शर्यत बचाव समितीचे हनुमंतराव चवरे -, श्रीमंत जगदाळे, प्रताप झाजुर्णे, हनुमंत निकम, राजेंद्र गिरी, राहुल कापले, अक्षय घोरपडे, आकाश शिंदे, महेश मोरे, श्रीमंत निकम ,सागर फाळके, श्याम अष्टेकर, दीपक देवकर, विपुल कदम, विनोद मोरे, विकास भोसले, बाळू जाधव व शेतकरी आणि बळीराजा प्राणी व बैलगाडी शर्यत बचाव समितीच्या सर्वांनी भेट घेऊन निवेदन दिलेले आहे .


सदर बैलगाडी मालकांना बैलगाडी शर्यत सहभाग घेता यावा व अल्प कालावधीनंतर हेअर टॅग बाबतचा नेम थोडा शिथिल करून बैलगाडी शर्यतीतील बैलांच्या गळ्यामध्ये टॅग लावावा .अशी सूचना यानिमित्त करण्यात आली .याबाबत व्यापक धोरण ठरवण्यासाठी बळीराजा प्राणी व बैलगाडी शर्यत बचाव समितीच्या वतीने दिनांक १२ जून रोजी दुपारी कोरेगाव या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती हनुमंत निकम व हनुमंतराव चवरे पाटील यांनी दिली आहे. यावेळी सातारा जिल्ह्यातील बैलगाडी शर्यत मालक व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related posts

संग्रहालयांच्या माध्यमातून सांस्कृतिक श्रीमंतीचे दर्शन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

editor

कामगारांच्या मृत्यूला जबाबदार विकासकाला अटक का नाही ? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त्या विद्याताई चव्हाण

editor

बालगृहातील मुली व माजी संस्थाश्रयी महिलांचे प्रश्न तात्काळ सोडवावेत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

editor

Leave a Comment