जालना , १३ जून :
जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरांमध्ये भोकरदन जालना या मुख्य महामार्गावर नांजा फाट्यावर मराठा समाज बांधवांकडून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.
यावेळी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मागील सहा दिवसापासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले असून त्यांच्या उपोषणाकडे प्रशासन व शासन जाणून-बुजून दुर्लक्ष करत असल्याचा ठपका ठेवत मराठा आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे व जरांगे पाटील यांच्या अटी मान्य करत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट करून न्याय द्यावा अशी मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली आहे.
याप्रसंगी बोलताना मराठा आंदोलन म्हणाले की सरकार फक्त मराठा समाजाची दिशाभूल करत असून तारीख पे तारीख देत आहे मात्र आता तारीख पे तारीख नसून प्रत्यक्षात अंमलबजावणी जोपर्यंत सरकार करत नाही तोपर्यंत आता मराठी मागे हटणार नाही अशी भूमिका आज या आंदोलनादरम्यान मराठा समाज बांधवांनी घेतली होती यादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून भोकरदन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांनी आंदोलकांची समज काढत मराठा समाज बांधवांना शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. तर या आंदोलनामुळे काही काळ ज्यांना भोकरदन महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून राहिल्या होत्या.