politics

राहुल गांधीच्या वक्तव्याचा भाजप कडून निषेध

Share

विरार प्रतिनिधी , ३ जुलाई :

काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसद भवनात स्वतःला हिंदू म्हणवून घेणारे हिंसक असतात.असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.
राहुल गांधींच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ नालासोपारा विधानसभा प्रमुख राजन नाईक यांचा मार्गदर्शनाखाली आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष विनीत तिवारी यांच्या नेतृत्वाखाली नालासोपारा पूर्वेला राधाकृष्ण हॉटेलजवळ आंदोलन करत राहुल गांधी यांनी हिंदूं समाजाची माफी अशी मागणी केली.


यावेळी मनोज बारोट यांनी सांगितले की, स्वत:ला हिंदू म्हणवणाऱ्या राहुल गांधींनी स्वतः सांगावे की ते हिंदू आहेत की नाही? आणि जर राहुल गांधी हिंदू असेल तर तो हिंसक आहे. आणि जर तो हिंसक नसेल तर तो हिंदूही नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी त्यांच्या मनात असलेली हिंदुद्वेषी मानसिकता त्यांच्या जिभेवर येते.बारोट यांनी अनेक उदाहरण मांडत सांगितले की, हिंदू हिंसक असते तर काश्मिरी पंडितांनी स्थलांतर केले नसते, हिंदू हिंसक असते तर अमरनाथ आणि वैष्णोदेवी यात्रेकरूंवर हल्ले झाले नसते, हिंदू हिंसक झाले असते तर राम मंदिराला ५०० वर्षे लागली नसती. जर हिंदू हिंसक झाला असता तर काशी मथुरेसाठी कोर्टात गेला नसता. हिंदू हिंसक झाले असते तर बंगालमध्ये हिंदू मारले गेले नसते. हिंदू हिंसक झाला असता तर लव्ह जिहाद, लँड जिहादसारख्या घटना देशात घडल्या नसत्या. हिंदू हिंसक झाले असते तर या देशाच्या बहिणींची शव सुटकेशमध्ये सापडले नसती.हिंदू हिंसक झाले असते तर गायी मातेंची हत्या झाली नसती. हिंदू हिंसक असता तर कन्हैया लालच्या मानेवर चाकू चालला नसता. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर हिंदू हिंसक झाला असता तर त्याने राहुल गांधींचे बकवास ऐकून न घेता तिथेच त्यांचे कपडे काढून संसद भवनातच त्यांना मारहाण केली असती. मात्र हिंदूंनी नेहमीच हिंसेचा मार्ग न निवडता बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेचा आधार घेतला आहे.

या निषेध मोर्चादरम्यान भाजपच्या सरचिटणीस प्रज्ञा पाटील, अभय कक्कर, विश्वास सावंत, जिल्हा उपाध्यक्ष मनोज बारोट, मुजफ्फर घनसार, युवा अध्यक्ष विनीत तिवारी, युवा सरचिटणीस योगेश सिंग, वैभव झगडे, नालासोपारा शहर अध्यक्ष देवराज सिंह, विरार शहर अध्यक्ष नारायण मांजरेकर, दक्षिण भारतीय सेलचे जिल्हा संयोजक राजेश नारायण, युवा उपाध्यक्षा परिक्षीत देशमुख, ज्योती खानविलकर युवा अध्यक्ष रोहित गुप्ता, कुणाल गुप्ता, सिद्धेश भणगे, देवदत्त मेहेर, मनमीत राऊत, साही गवळी, गोविंद मिश्रा व संस्कार शर्मा यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related posts

बारामतीत १४ जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसची अभूतपूर्व जाहीर सभा – सुनिल तटकरे

editor

पहिल्याच पावसाने सरकारचे पितळ उघडे पाडले ! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका

editor

Slovakia’s Prime Minister Robert Fico Shot and Critically Injured; PM Modi Expresses Shock

editor

Leave a Comment