Civics Mahrashtra

विधानसभेच्या तयारीसाठी भाजपची शुक्रवारी बैठक : देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार

Share

मुंबई प्रतिनिधी,१२ जून :

लोकसभा निवडणुकीतील अपयश लक्षात घेत भाजपने आगामी विधानसभा निवडणूक पूर्ण गांभीर्याने लढविण्याचे ठरविले असून त्यासाठी आतापासून तयारी सुरु केली आहे. विधानसभा निवडणूक तयारी आणि निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी भाजपने येत्या शुक्रवारी ( १४ जून ) पक्षाची बैठक बोलवली आहे. या बैठकीत सद्य राजकीय स्थितीवर चर्चा होऊन विधानसभा निवडणुकीची आखणी केली जाणार आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला अपयशाचा सामना करावा लागला. भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादीला सोबत घेत लोकसभेच्या ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार केला होता. मात्र, प्रत्यक्षात महायुतीला १७ जागांवर समाधान मानावे लागले. लोकसभेच्या २८ जागा लढविणाऱ्या भाजपला केवळ ९ जागा मिळाल्या. लोकसभा निवडणुकीचे निकाल भाजपसाठी धोक्याची घंटा ठरल्याने भाजपने येत्या ऑक्टोबर महिन्यात होऊ घेतलेल्या विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे.

या पार्श्वभूमीवर प्रदेश भाजप प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक १४ जून रोजी मुंबईत दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई विभागीय अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांच्या उपस्थित होणाऱ्या बैठकीला भाजपचे जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी तसेच मुंबईतील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

Related posts

नाना पटोले यांनी राहुल गांधींच्या पदयात्रेचे आणि न्यायपत्राच्या योगदानाचे केले कौतुक

editor

पाणीटंचाई असलेल्या भागात टँकरने पाणीपुरवठा करणार;उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा

editor

कोस्‍टल रोडच्‍या बाजूची मोकळी जागा बिल्‍डरांना देण्‍याचा घाट होता का ?

editor

Leave a Comment