politics

भाजप नागनाथ तर काँग्रेस सापनाथ – प्रकाश आंबेडकर यांची टीका

Share

मुंबई प्रतिनिधी ,१४ जून :

भाजप आणि काँग्रेस पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे बहुजनांनी समजून घेण्याची गरज आहे. भाजप आपला अजेंडा लपवत नाही आणि उघडपणे आपल्या फुटीरतावादी अजेंडाचा प्रचार करत आहे. तर काँग्रेस आपला खरा अजेंडा लपवून हसतमुखाने बहुजनांना अडकवून त्यांचा गैरफायदा घेतात. बहुजन फसले की काँग्रेस आपले विषारी दात दाखवते. त्यामुळे भाजप नागनाथ आणि काँग्रेस सापनाथ आहे,अशी जळजळीत टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी केली.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीवंचित बहुजन आघाडीचा दारुण पराभव झाला. २०१९च्या लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत मिळालेली मते सुद्धा वंचितला या लोकसभा निवडणुकीत टिकवता आली नाहीत. लोकसभा निवडणुकीत वंचितच्या सर्वाधिक उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. निवडणुकीत जनाधार घटल्याचे खापर आंबेडकर यांनी महाविकास आघाडी विशेषतः काँग्रेसवर फोडले आहे. यासंदर्भात त्यांनी गुरुवारी एक्स या समाज माध्यमात पोस्ट टाकली आहे. मी पुढे जाऊन विजयी व्हावे असे काँग्रेसला वाटत नाही, असा आरोप आंबेडकर यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत आघाडी न झाल्याने वंचित बहुजन आघाडीला स्वतंत्र निवडणूक लढवावी लागली. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या समर्थकांनी वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम आहे अशी टीका केली असून या टीकेला हे उत्तर असल्याचे सांगत आंबेडकर यांनी एक्सच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे.

सोशल मीडियावर दररोज काँग्रेस समर्थक माझ्यावर आणि वंचित बहुजन आघाडीवर भाजपची बी-टीम असल्याचा आरोप करतात. मी भाजपची बी-टीम आहे का? मी त्याच प्रश्नांची वारंवार उत्तरे देऊन थकलो आहे. हा जातीय आरोप प्रत्येक भारतीय मुस्लिमाला विचारलेल्या प्रश्नासारखाच आहे. मी निवडणूक लढवतो म्हणून मी भाजपची बी-टीम आहे, असे म्हणणाऱ्या लोकांना मला एकच सांगायचे आहे की मी निवडणूक का लढू नये? भारतात द्विपक्षीय व्यवस्था आहे का? असा सवाल आंबेडकर यांनी केला आहे.

मी काँग्रेसवर टीका करतो, पण मी भाजपवर सर्वाधिक टीका करतो हे त्यांना दिसत नाही. मी भाजपची बी-टीम आहे तर पैसा कुठे आहे? मी पुण्यात एका २ बीएचके फ्लॅटमध्ये राहतो. वंचित बहुजन आघाडी आणि माझ्या वैयक्तिक मालमत्तेची माहिती सार्वजनिक आहे आणि ती कोणीही मिळवू शकते. भाजपच्या ऑफर मी असंख्य वेळा नाकारल्याचे काळाने दाखवून दिले आहे. माझ्यावर भाजपची बी-टीम असल्याचा आरोप करणाऱ्या नेत्यांनी आमच्या मुंबईतील पक्ष कार्यालयात यावे. आमचे पक्ष कार्यालय तुमच्या भव्य आधुनिक बाथरूमपेक्षा लहान आहे. आमचा पक्ष सर्वसामान्यांकडून मिळणाऱ्या देणग्यांवर चालतो. फुले-शाहू-आंबेडकर आपल्या हृदयात आणि विचारात आहेत. मग माझ्यावर बी-टीम असल्याचा आरोप कशाच्या आधारावर करता? असा सवाल आंबेडकर यांनी केला आहे.

संविधान वाचवण्याचे आणि दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लिम यांच्या हक्कांचे रक्षण करण्याचे काम महाराष्ट्रात आमच्यापेक्षा चांगले कोणी करू शकत नाही. आम्ही कोणत्याही बॉसला उत्तरदायी नाही. आम्ही फक्त आमच्या लोकांना जबाबदार आहोत. आम्ही कोणत्याही बाहुल्याच्या तालावर नाचत नाही. आम्ही कोणाचे चमचे नाही. आम्ही स्वतंत्र आहोत आणि आमच्याकडे स्वतंत्र नेतृत्व आहे. माझे आजोबा आपल्या देशाच्या संस्थापकांपैकी एक होते आणि त्यांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्त्वे लोकशाहीची मूलभूत तत्त्वे म्हणून स्थापित केली. मी आंबेडकरवादी आहे. मी माझे संपूर्ण आयुष्य वर्णद्वेष, भेदभाव आणि दडपशाहीने पीडित लोकांच्या राजकीय हक्कांसाठी लढण्यासाठी समर्पित केले आहे आणि निवडणुकीच्या निकालाची पर्वा न करता मी लढत राहीन. त्यामुळे मी वचन देतो की मी परत येईन, असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी लढण्याचा निर्धार कायम ठेवला आहे.

Related posts

लोकसभेप्रमाणे विधानसभेच्या जागा वाटपात अंतर्गत कुरघोडीचा वाद उफाळणार ? पक्षश्रेष्ठींनी जागा वाटपाच्या तिढ्याबाबत विचाराने निर्णय घेण्याची वेळ !भिवंडी विधानसभेत २ आमदार हॅट्रिकवर ,१ चौथ्यांदा नशीब आजमवणार

editor

सोशल मिडियावर बदनामीकारक पोस्ट व्हायरल केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

editor

Tragedy Strikes Mumbai: Deadly Billboard Collapse Amidst Ferocious Storm

editor

Leave a Comment