Civics

महिला, युवा, शेतकरी, मुलीं साठीच्या योजनांचा प्रभावी प्रचार करणार…

Share

बारामतीत १४ जुलैला जाहीर सभा ;विधानसभा निवडणूकीत सकारात्मकता यावरच भर..

अर्थसंकल्पाने जनतेचा आत्मविश्वास वाढला – सुनिल तटकरे

मुंबई, दि. ८ जुलै :

विकासाचा दृष्टीकोन अन विकसित महाराष्ट्र ही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आगामी विधानसभा निवडणूकांमध्ये महाराष्ट्रातील जनतेसमोर घेवून जायची आहे. आगामी विधानसभा निवडणूक आपल्या लोककल्याणकारी योजनांवरच आपण लढणार आहोत अशा स्पष्ट सूचना करतानाच अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या महिला, युवा, शेतकरी, वारकरी, दुर्बल, आदिवासी, मागासवर्ग आणि अल्पसंख्याक समाजासाठीच्या क्रांतिकारी योजना लोकांपर्यंत घेवून जा. असे स्पष्ट आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पक्षाच्या बैठकीत दिले.

महिला आर्थिक विकास मंडळाच्या सभागृहात आजी-माजी आमदारांसह प्रदेश स्तरावरील विशेष निमंत्रितांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

आगामी निवडणूकांमध्ये आपण जी रणनीती आखली आहे. जे काम हाती घेतलेय त्यावरच आपण जनतेच्या समोर जाणार आणि जिंकणार आहोत असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, दिनांक १४ जुलै रोजी बारामती येथे पक्षाची जाहीर सभा आयोजित करण्यात आल्याची घोषणाही अजितदादा यांनी यावेळी केली.

आता आपण इतर बाबींकडे लक्ष देण्याऐवजी पहिल्यांदा लग्न निवडणूकीचे हे उद्दीष्ट नजरेसमोर ठेवून लढूया. असे आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केले.

आपण अर्थसंकल्पात कृषीपंपाच्या वीजबिल माफीचा निर्णय घेतला. तो अनेकांना आवडला आहे. महिलांसाठी दरमहा दीड हजार रूपये या योजनेचे राज्यभरात स्वागत होत आहे. बळीराजाला कायम मोफत वीज मिळेल यासाठी मागेल त्याला सौर कृषीपंप अशी योजना आपण आणली आहे. सौरऊर्जेचे हे धोरण शेतकर्‍यांनी आनंदाने स्विकारले आहे. बहिणींसोबत भावंडांनापण या विविध योजनांचा लाभ होणार आहे हे सत्य जनतेच्या समोर मांडा. असे आवाहन अजितदादा पवार यांनी यावेळी केले.

आपण आपल्या या योजनांचा प्रचार, प्रसार विधानसभा निवडणूकीच्या मतदानापर्यंत लावून धरायचा आहे. विरोधकांच्या कोणत्याही नकारात्मक प्रचाराला बळी न पडता आपण आपल्या सकारात्मक निर्णयावर जनतेच्या समोर जायचे आहे. असेही अजित पवार यांनी सांगितले.

मनुस्मृती कदापि मान्य नाही..!

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कायमच लोकशाहीवादी आणि समतेची भूमिका जपणारा पक्ष आहे. असे सांगताना अजितदादा पवार यांनी शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश होणार असेल तर तो आपल्या पक्षाला कदापि मान्य नाही. आपण कायमच मनुस्मृतीच्या विरोधात आहोत… आणि राहणार आहोत. शालेय शिक्षणमंत्री यांनी काही श्लोकांचा दाखला देत समर्थन केले असले तरी आपला पक्ष कधीही मनुस्मृतीला स्विकारणार नाही. असेही अजितदादा पवार यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

Related posts

महिला स्वच्छताकर्मींनी केला मतदानाचा निर्धार व इतरांनाही केले मतदानाचे आवाहन

editor

फिरत्या वाहनावरील दुकान योजनेचा लाभ घेण्याचे दिव्यांगांना आवाहन

editor

कल्याणमधील अनधिकृत पब आणि बारवर केडीएमसीची कारवाई

editor

Leave a Comment