politics

बिगुल आणि तुतारी चिन्ह गोठवले ! राज्य निवडणूक आयोगाचा निर्णयराष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला दिलासा

Share

मुंबई प्रतिनिधी , दि. २१ :

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या तक्रारीनंतर राज्य निवडणूक आयोगाने आपल्या मुक्त चिन्हांच्या यादीतून बिगुल आणि तुतारी हे निवडणूक चिन्ह गोठवले आहे. निवडणूक आयोगाने अलीकडेच यासंदर्भातील पत्र सर्व जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना पाठवले आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तुतारी आणि अपक्ष उमेदवारांना देण्यात आलेले पिपाणी या निवडणूक चिन्हामुळे मतदारांचा होणारा गोंधळ उडाला होता. शरद पवार गटाला या गोंधळाचा फटका सातारा आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात बसला होता.सातारा मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा ३२ हजार ७७२ मतांनी पराभव झाला होता. या मतदारसंघात पिपाणी चिन्ह असलेल्या अपक्ष उमेदवाराला ३७ हजार ६२ मते पडली होती. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांनी तत्कालीन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा १ लाख १३ हजार १९९ मतांनी पराभव केला. परंतु या मतदारसंघात पिपाणी निवडणूक चिन्ह असलेले अपक्ष उमेदवार बाबू भगरे यांना तब्बल १ लाख ३ हजार ६३२ मते मिळाली होती.

या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाने खुल्या निवडणूक चिन्हातून पिपाणीला वगळण्याची मागणी केली आहे. या मागणीवर भारत निवडणूक अद्याप निर्णय घेतला नसला तरी राज्य निवडणूक आयोगाने आपल्या अधिकारात बिगुल आणि तुतारी हे निवडणूक चिन्ह गोठवले आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी १६ जुलै २०२४ रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे.

महाराष्ट्रातील राज्यस्तरीय पक्षांच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार या पक्षाचा समावेश करण्यात आला असून या पक्षाचे चिन्ह ‘तुतारी वाजवणारा माणूस’ असे आहे. ३० नोव्हेंबर २०१९ च्या अधिसूचनेतील परिशिष्ट तीन नुसार बिगुल आणि तुतारी ही मुक्त चिन्हे गोठविण्यात येत आहेत. शिवसेना आणि नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीच्या संदर्भातील बदल सर्वोच्च न्यायालयाच्या प्रलंबित असलेल्या निकालाच्या अधीन राहून करण्यात येत आहे. या बदलाची अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या यापुढील सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकीत अंमलात येतील, असे सुरेश काकाणी यांनी पत्रात नमूद केले आहे.

Related posts

Traffic Advisory Issued for Prime Minister Modi’s Kolkata Roadshow

editor

मुस्लीम मतांसाठी ओबीसी मुलांच्या भविष्याचा बळी इंडिया आघाडी देते आहे – संजय पांडे

editor

काँग्रेसला आजही हरवणे हाच आणीबाणीचा निषेध – उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक

editor

Leave a Comment