Culture & Society national

स्वभाषेच्या अभिमानाची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांकडून –मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Share

नवी दिल्ली दि.21फेब्रुवारी :

९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सन्मान सरहद संस्थेचे संस्थापक व संमेलनाचे निमंत्रक संजय नहार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवमुद्रा व त्यामध्ये लेखणी असलेले संमेलनाचे बोधचिन्ह देऊन केला. तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे व कोषाध्यक्ष प्रकाश पागे यांनी जरीपटका ही संमेलनाची स्मरणिका देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सन्मान केला.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे संमेलन दिल्लीत होणे ही सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जगभरातील मराठी माणसांचे स्वप्न या निमित्ताने पूर्ण झाले. परकीय आक्रमकांनी आपल्या भाषेला प्रदुषित करण्याचा प्रयत्न केल्यावर शिवाजी महाराजांनी राजकारभारात मराठीचा उपयोग करण्याचा निर्णय केला. सर्व फारसी, ऊर्दु शब्द वगळून मराठीचे शब्द आणण्याची परंपरा त्यांनीच सुरू केली. स्वभाषेचा अभिमान आणि आग्रह छत्रपती शिवाजी महाराजांकडूनच आपण शिकलो आहोत. संमेलन होत असलेल्या तालकटोरा स्टेडिअममध्ये 1737 मध्ये मराठ्यांनी आपली छावणी लावून दिल्ली जिंकली होती. आता आमचा मराठी माणूस आपल्या विचारांनी दिल्ली जिंकणार आहे.

विश्व मराठी संमेलनात पु.ल. देशपांडे म्हणाले होते, आपल्या मातृभाषेवर प्रेम करणाऱ्याला माया आणि वात्सल्य समजतं आणि तो दुसऱ्या भाषेवरही प्रेम करतो. मराठी भाषेने असे सर्वांना आपलेसे केले आहे. ती लोकभाषा होऊन, लोकसाहित्य निर्माण झाल्याने मराठी समृद्ध झाली. संतांनी मराठी भाषा अधिक समृद्ध केली. कला, साहित्य, संस्कृती मराठी माणसाच्या ठायी वसलेली आहे. त्यामुळेच वेगवेगळी साहित्य संमेलने महाराष्ट्रात होत असतात, त्यात बोली भाषांना स्थान मिळत असते. दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मराठीची सेवा करण्याची संधी सर्वांना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. हे अधिवेशन ऐतिहासिक ठरणार असल्याचे सांगून 100 वे अधिवेशनही भव्य स्वरुपात साजरे करण्यात येईल, असेही फडणवीस म्हणाले.

Related posts

बुलढाण्याचा १८ महिन्यांचा अंशिक ठरला आयबीआर अचीव्हर; अंशिकच्या नावाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद

editor

Prime Minister Modi’s Vision for India: Reflections on Elections and State Progress

editor

श्रीमंत दगडूशेठ गणपतीला ५२१ पदार्थांचा महानैवेद्य आणि १ लाख २५ हजार दिव्यांची आरास ; त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आकर्षक सजावट

editor

Leave a Comment