Mahrashtra

अपघातग्रस्त नौका मालकाला मालवाहू जहाजाच्या कंपनीकडून नुकसान भरपाई

Share

मुंबई ,१७ जानेवारी :

मुंबईतील समुद्रात चीन देशाच्या माल वाहतूक जहाजाने धडक दिल्याने मासेमारी नौकेचे नुकसान झाले होते. त्या मालवाहू जहाजाच्या कंपनीने नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले होते. या नुकसान भरपाईचा १८ लक्ष ५५ हजार रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकसानग्रस्त नौकेच्या मालकाला प्रदान करण्यात आला.

मंत्रालयात मंत्री परिषद संपल्यानंतर नुकसानग्रस्त नौका मालकाला धनादेश देण्यात आला. या वेळी मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

मुंबई समुद्रात हेमदीप टिपरी यांच्या मालकीच्या तिसाई या मासेमारी नौकेला २८ डिसेंबर २०२४ रोजी मालवाहतूक जहाजाने धडक दिली होती. या धडकेत सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी मासेमारी नौकेचे मोठे नुकसान झाले होते. स्थानिक परवाना अधिकारी, सागरी पोलीस, बंदर निरीक्षक व मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी यांच्या समक्ष पंचनामा केला होता. त्यानुसार रुपये १८ लक्ष ५५ हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगितले.

बंदरे विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार संबंधित जहाज कंपनी व अपघातग्रस्त नौका मालक यांची बैठक बोलवण्यात आली होती. त्या बैठकीत कंपनीने नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले होते.

Related posts

लोकसभेप्रमाणे विधानसभेच्या जागा वाटपात अंतर्गत कुरघोडीचा वाद उफाळणार ? पक्षश्रेष्ठींनी जागा वाटपाच्या तिढ्याबाबत विचाराने निर्णय घेण्याची वेळ !भिवंडी विधानसभेत २ आमदार हॅट्रिकवर ,१ चौथ्यांदा नशीब आजमवणार

editor

विविध प्रशासकीय विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांचे सुसूत्रीकरण करण्यासंबंधात उच्चस्तरीय समितीची स्थापना

editor

निवडणूक देणगीसाठी ठाकरे गटाची उठाठेवशिंदे गटाच्या संजय निरुपम यांचा आरोप

editor

Leave a Comment